इतर

मराठा क्रांती ठोक मोर्चाची निदर्शने; विरोधकांकडून अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई/पंढरपूर: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. येत्या काळात आमदार आणि खासदारांना रस्त्यावर फिरु देणार नसल्याचा इशारा मराठा ठोक मोर्चाचे राज्य समंवयक महेश डोंगरे यानी दिला आहे.

मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस, अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं : प्रवीण दरेकर

मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस, सरकारचा निष्काळजीपणा नसल्यानं हा निकाल लागला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. कोर्टाचा निकाल आला आहे त्याला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप दरेकर घ्यावं. अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं, ठाकरे सरकारनं याला सामोरं जावं, असं आव्हान प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे.

अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा : विनायक मेटे

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button