Top Newsराजकारण

शरद पवार उतरले कुस्तीच्या आखाड्यात म्हणाले, ‘मी अजून म्हातारा झालो नाही’!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज खुद्द ‘मी अजूनही म्हातारा झालो नाही’ असं थेट कुस्तीच्या मैदानात उतरून सांगितलं! शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मिष्किपणे असा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत त्यांचे कौतुक केले.

विधानसभेची २०१९ ची निवडणूक शरद पवारांनी गाजवली. अनेक नेते राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरत होते. शरद पवारांचे अनेक निकटवर्तीयही त्यांची साथ सोडून जात होते. त्यावेळी एकट्या शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढत राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा दिली. त्यावेळी अनेक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी पवारांचा उल्लेख ’७८ वर्षाचा तरुण’ असा केला. त्यानंतर शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवाच्या व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. त्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या शरद पवारांनी अगदी मिश्किलपणे मी अजून म्हातारा झालो नाही. आयोजक बोलले की या वयात… मी आयोजकांवर नाराज आहे, असं म्हटलं. पवार पुढे म्हणाले की, कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत आहेत याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा श्रेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची, अशा शब्दात पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशाराही दिला.

शरद पवार रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळीही पवारांनी आपण म्हातारे झालो नसल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेलं पक्षांतर, उस्मानाबादचा पाणी प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर शरद पवारांना टोले मारले. तर, उद्धव ठाकरे चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले. सतत ५२ वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं ८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.

पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं प्रत्युत्तर

रयत क्रांती संघटेनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर ट्विट द्वारे टीका केली आहे. शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील कार्यक्रमात बोलताना काही जण निवडणूक होण्यापूर्वीचं मी येणार मी येणार असं म्हणत होते. मात्र, आम्ही येऊ दिलं नाही असं म्हटलं होतं. पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला होता. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. त्या यात्रेची टॅगलाईन मी पुन्हा येईन ही होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की असल्याचं ट्विट करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सदाभाऊ खोत यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button