मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं घेतली आहे. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना यात जितेंद्र नवलानी हे नाव सर्वात महत्वाचे आहे, असा उल्लेख केला आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलानी असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव राऊतांनी सांगितलं आहे. यात ६० कंपन्यांनी १०० पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसुल केलेत. या कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्याची ईडीनं चौकशी केली. त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलानी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.
२०१७ मध्ये ईडीनं दिवाणा हाऊंसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. जितेंद्र नवलानीला २५ कोटी ट्रान्सफर झाले. मग ३१ मार्च २०२२ पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून १० कोटी ट्रान्सफर केले नवलानीला, नवलानीच्या सात कंपन्यांनी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले.१५ कोटी रुपये अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. अनसिक्युअर्ट ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही, तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश चैक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकारीच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन. नवलानी कोणंय..? सौमय्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, असा सावल राऊतांनी उपस्थित केलाय.
ईडीचे मोठे अधिकारी या नवलानीसोबत कसे जोडले गेले आहेत. पब्लिक सेक्टर बँकेचं लोन न देणारे लोक नवलानीला कसले पैसे देतात, तर कसली कन्सलटन्सी देतात, हा सगळा पैसे दिल्ली आणि मुंबईत बसलेल्या ईडी ऑफिसरला दिला जातोय, परदेशात या पैशांनी बाहेर जमीन खरेदी केली जाते आहे. आणि आता आमच्या लोकांचे एक दोन तीन लाखाचे व्यवहार पाहत आहेत. तुमचं ट्रान्सझॅक्शन कोण पाहणार आहे. हे मी हवेत बोलत नाहीय.. कागद दिलंय, असेही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.
देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे. मविआच्या लोकांना चुचकारण्याचं काम जे होतंय. हेही याच रॅकेटचा भाग आहे. ही फक्त १० टक्के गोष्ट आहे. याबाबत एक अहवालही समोर आला आहे. विजिलन्स रिपोर्ट समोर आला आहे. तोही मी पीएमला पाठवलाय, असेही यावेळी राऊतांनी सांगितलं.
तसेच मी १५ फेब्रुवारीला ईडी अधिकाऱ्याबद्दल बोललो होतो. अनेक नेते आहेत भाजपचे यात, सोमय्या तर गेस्ट आर्टिस्ट आहेत. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचं तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. जो ईडीचा अधिकारी होती ज्यानं निवडणूक लढवली, त्यानं पन्नास जणांचं खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशिन बनलीये. मी अतिशय जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतली सगळा कच्चाचिट्ठा पीएम कार्यालयाला दिलाय. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाहीये, तर भ्रष्टाचारही साफ करायचाय. मी पत्र लिहिलंय की म्हटलंय की ईडीला जे तुम्ही कामाला लावलंय. जे तुमचे राजकीय विरोधक आहेत. भाजपविरोधात दहा भाग पीएम कार्यालयाला देणारा. भाग भागात देणार. मागच्या काही वर्षांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट त्यांचं एक नेटवर्क बिल्डर डेव्हलपर आणि कॉर्पोरेटला धमकावण्याचं काम करतंय. ईडीकडून या सगळ्यांकडून वसुली केली जातेय. या सगळ्यांचे डॉक्युमेन्ट्साही दिलेत, असे पुरावे आज संजय राऊतांनी माडंले आहेत.
सोमय्या सीरियल कंप्लेनंट
राऊत यांनी आज थेट भाजप नेते किरीट सोमय्या यांनाच टार्गेट केलं. जुन-जुलै २०१५ मध्ये सोमय्यांनी एचडीआयएल आणि जीव्हेकेवर मुंबईची ६३ एकर जमीन हडपण्याचा आरोप केला. त्यांनी एमएमआरडीएमध्ये सातत्याने तक्रारी केल्या. त्यांची ती सवय आहे. ते सीरियल कंम्प्लेनर आहेत. सीरियल किलर असतो, सीरियल रेपिस्ट असतो तसा तो सीरियल कंम्पलेनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. ऑक्टोबर २०१५ मध्ये सोमय्याने एमएमआरडीएवर आरोप लावला की एचडीआयएलला एक कोटी स्क्वेअरफूट कमर्शियल जमीन गिफ्ट दिली. त्याची मार्केट व्हॅल्यू ५ हजार कोटी आहे. त्यामुळे घोटाळ्याची स्पेशल चौकशी झाली पाहिजे. दोन्ही कंपन्यांना ब्लॅकमेल केलं पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. एक वर्ष त्यांनी सातत्याने एमएमआरडीएकडे तक्रार केली. चौकशीची मागणी केली होती, असं राऊत यांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांनी त्यांच्या कोणत्याच पत्रकात कधीच पोलीस किंवा केंद्र सरकारकडे या प्रकरणाची त्यांनी तक्रार दिली नसल्याचं उघड झालं आहे. त्यावेळी ते खासदार होते. ते लोकसभेत मुद्दा उचलू शकत होते. पण त्यांनी लोकसभेतही हा मुद्दा उचलला नाही. उलट २०१६ मध्ये त्यांनी एमएमआरडीएला तक्रार करणं बंद केलं. १ डिसेंबर २०१६ मध्ये सोमय्याचा मुलगा नील सोमय्याला निकॉन इन्फ्रामध्ये पार्टनर बनवलं गेलं. त्यानंतर तक्रारीही बंद झाल्या. २७ जुलै रोजी निकॉनने ५ हजार स्क्वेअर मीटरच्या जमिनीच्या विकासाचे हक्क मिळवले, असं राऊत म्हणाले.
बाप-बेटे जेलमध्ये जाणार
राकेश वाधवानला पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुनही जमीन घेतली. हे सगळं संशयास्पद आहे. वाधवानच्या एडीआयएलचा घेऊन इतके गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्यासोबत असे व्यवहार कसे काय करु शकते? असा सवाल करतानाच बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. किती कागद फडफडवा, असा दावाही राऊत यांनी केला.
ईडीचे मोठे अधिकारी या नवलानीसोबत कसे जोडले गेले आहेत. पब्लिक सेक्टर बँकेचं लोन न देणारे लोक नवलानीला कसले पैसे देतात, तर कसली कन्सलटन्सी देतात, हा सगळा पैसे दिल्ली आणि मुंबईत बसलेल्या ईडी ऑफिसरला दिला जातोय, परदेशात या पैशांनी बाहेर जमीन खरेदी केली जाते आहे. आणि आता आमच्या लोकांचे एक दोन तीन लाखाचे व्यवहार पाहत आहेत. तुमचं ट्रान्सझॅक्शन कोण पाहणार आहे. हे मी हवेत बोलत नाहीय.. कागद दिलंय. देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे. मविआच्या लोकांना चुचकारण्याचं काम जे होतंय.
मुंबई पोलिसांत तक्रार
मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत. माझे शब्द लिहून ठेवा. या प्रकरणात ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाऊ शकतात. ही चोरी, लफंगेगिरी आहे. कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातायत? हा पैसा पीएम केअर फंडमध्ये जातोय का, असा सवाल त्यांनी केला. हा सारा पैसा विदेशात जातोय. त्या मागे खूप मोठे रॅकेट आहे. यामध्ये भाजपचे नेतेही सहभागी आहेत. तुम्हाला याची माहिती देतोय. हे हवेत बोलत नाही. पुढच्या पत्रकार परिषदेत त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. काही जण कागदांवर बोलताना ना. आम्हीही ईडीला कागद दिलाय, पण त्याकडे तर कुणी पाहिलं नाही. आता मुंबई पोलीस अख्ख्या विश्वात बेस्ट आहे. तेच याची चौकशी करतील.
मुंबईत आज बऱ्याच घडामोडी घडत आहेत. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यामुळे तुम्हालाही खूप काम आहे. इथून तिथे तिथून इथे. आम्ही ठरवलं आपणही रेड टाकावी. आम्हाला घुसायचा अधिकार आहे. आमच्या घरात कुणी घुसत असेल तर मुंबईत शिवसेनेलाही घुसायचा आणि घुसवायचा अधिकार आहे. मी सकाळापासून पाहत आहे. आज काही कार्यकर्त्यांवर आयकरच्या धाडी पडत आहेत. काही भानामती सुरू आहेत. आता आयटीच्या भानामती सुरू आहे. जोपर्यंत बीएमसीच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत प्रत्येक वॉर्डात धाडी पडतील. आता जिथे जिथे सेनेचे कार्यकर्ते आहेत, निवडणूक लढत आहेत, शाखा आहेत तिथे धाडी टाकाव्यात, एवढंच काम ईडीला राहिलं आहे.
केवळ महाराष्ट्र आणि बंगालमध्येच सिलेक्ट लोकांनाच टार्गेट का केलं जात आहे हा सवाल आहे. या देशात इतर राज्यात कोणी मिळत नाही का? केवळ शिवसेना आणि तृणमूलच मिळत आहे का? हे सरकार पाडण्याचं षडयंत्र आहे. शिवसेनेच्या आघाडीच्या सरकारला दबावात आणून त्यांना अस्थिर करण्याचं हे मोठं षडयंत्रं आहे.
आयकर आणि ईडीला मी पुराव्यासह ५० नावं पाठवली आहेत. मी वारंवार उल्लेखही केला आहे. पण ईडी आणि आयकरला एक जबाबदार खासदार काही बोलत असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे असं त्यांना वाटत नाही. आमच्याबाबतीत हे बोगस ते बोगस असं म्हटलं. किरीट सोमय्याने एका केंद्रीय मंत्र्यांबाबत बोगस कंपन्यांची लिस्ट दिली काहीच झालं नाही. कोणी ढवंगाळे यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी स्वत: पाठवली. काय झालं त्याच? संपूर्ण देशात सर्वाधिक ईडीची चौकशी, कारवाई केवळ महाराष्ट्रात झाली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमधील ७ लोकांवर कारवाई झाली आहे. भाजपच्या नेत्यांवर कोणतीही कारवाई नाही. ते काय हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे का. ही भानामाती काय आहे त्याचा शिवसेना लवकरच खुलासा कणार आहे.
सुमित कुमार नरवरच्या नावाचा मागे मी उल्लेख केला होता. बुलंद शहरातील या दूध विकणाऱ्या सामान्य माणसाची प्रॉपर्टी चार पाच वर्षात आठ हजार कोटी झाली आहे. आता मलबार हिलमध्ये तो राहतो. पूर्वी तो नोएडात राहत होता. त्याला राहायला घरही नव्हतं. ईडीने कोणता चष्मा लावला आहे. जरा आमच्याकडेही त्या चष्म्यातून पाहा. मी त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. दिल्ली महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा पैसा त्याच्याकडे आहे ही माहिती देईल. त्याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. पैसा कुणाचा आहे, ट्रायडन्ट कुणाचा आहे? पाच वर्षापूर्वी त्यांना कामं मिळत होती. माझ्याकडे सर्व माहिती आहे. ही भानामती सांगणार. त्यानंतर तुम्ही आमच्यावर रेडही टाकाल. आम्हाला अटक कराल. करा, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिका निवडणुका होईपर्यंत वार्ड, शाखेतही धाडी पडतील
संजय राऊत म्हणाले की, आज मुंबईत मोठी हालचाल आहे. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यासाठी तुम्हालाही मोठं काम आहे. आम्ही विचार केला आम्हीही एक धाड टाकावी. आम्हालाही अधिकार आहे. मुंबईत घुसण्याचा घुसवण्याचा शिवसेनेलाही अधिकार आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांवर ईडी नाही आता आयटीची रेड सुरु आहे. आयटीची भानामती चालू आहे. मला वाटतं की महापालिका निवडणुका होत नाहीत तोवर प्रत्येक वार्ड, शाखेत रेड पडतील. त्यांना आता एकच काम उरलं आहे. जिथे जिथे शिवसेना तिथे रेड टाकण्याचं काम त्यांच्याकडे आहे’, असा टोला राऊत यांनी ईडी आणि आयटीला लगावलाय.
किरीट सोमय्यांनी प्रश्न टाळले
संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा तोफा डागल्या. त्यानंतर राऊतांची पत्रकार परिषद संपताच राऊतांच्या आरोपांना उत्तर द्यायला सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी राऊतांनी घेतलेल्या नावांविषयी सोमय्यांना सवाल केले असाता सोमय्या टाळाटाळ करताना दिसून आले. किरीट सोमय्यांना जितेंद्र नवलानी आणि वाधवान यांच्याशी तुमचा काय संबध आहे? असा सवाल राऊतांनी केला आहे. तुम्ही नवलानीला ओळखता का? असा सावल केला असता, किरीट सोमय्या टाळाटाळ करत होते. त्यानंतर राऊतांनी घेतलेल्या नावांशी माझा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरणही सोमय्या देताना दिसून आले.
संजय राऊतांनी एका नावावर जास्त फोकस करत आरोप केले, त्या जितेंद्र नवलानी बद्दल सोमय्यांना विचारले असता एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर पुन्हा सोमय्या भडकल्याचे दिसून आले. तुम्हाला काय विचारायचे आत्ताच विचारून घ्या, मी नवलानीला ओळखत नाही, खूप लोक भेटतात, माझ्या लक्षात नाही, असं संतप्त उत्तर त्यांनी दिलं. यावेळी बरेच प्रश्न सोमय्या टाळतानाही दिसून आले. ठाकरेंनी माझ्याविरोधात कितीही आरोप करूदे, मी घाबरत नाही. तसेच उद्धव ठाकरे त्या बंगल्याविषयी का बोलत नाहीत? सामनातून माझ्याविरोधात कॅम्पेन चालवलं असाही अरोप सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्याला मारायला शंभर माणसं पाठली त्यातल्या फक्त चौदा लोकांना अटक झाली. बाकीचे कुठे आहेत, असा सवाल करत त्यात मुंबईतले गुंड आणले होते असा आरोप केला आहे. या आरोप प्रत्यारोपावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे.