Top Newsस्पोर्ट्स

नाशिकमध्ये रंगणार अ‍ॅडव्होकेटस प्रीमिअर लिग (Advocates Premier League) चा थरार

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते ११ मे रोजी उद्घाटन; राज्यातील ५०० वकिलांचा सहभाग

नाशिक : नाशिकमध्ये यंदा पहिल्यांदाच राज्यातल्या वकिलांच्या क्रिकेट Cricket सामन्यांचा थरार रंगणार आहे. नाशिक बार असोसिएशन Nashik Bar Association व स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन आणि नाशिक जिल्हा क्रिकेट अँड स्पोर्टस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेटस प्रीमिअर लिग, नाशिक २०२४’चे (Advocates Premier League) आयोजन दि. ११ ते १७ मे २०२४ अखेर करण्यात आले आहे. शनिवार, दि. ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालया Supreme Court चे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, उच्च न्यायालयाचे HIgh Court न्या. मकरंद कर्णिक, किशोर संत, संदीप युनिव्हर्सिटी अध्यक्ष डॉ. संदीप झा यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रीमिअर लिगचे उद्घाटन संदीप फाऊंडेशन संकुलाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी दिली आहे.

नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलात १७ मार्च २०२४ रोजी या लिगमधील खेळाडूंच्या निवडीसाठी ऑक्शनचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमधून महाराष्ट्रातील १६ संघमालकांनी जवळपास ३५० वकील खेळांडूंसाठी बोली लावली आणि आपले संघ निश्चित केले. याबाबत माहिती देताना आयोजकांनी पुढे सांगितले की, वकिलांच्या क्रिकेट स्पर्धा नाशिककरांना नवीन नाहीत. मात्र आयपीएलच्या धर्तीवर गत चार सिझन नाशिक बाहेर ही प्रीमिअर लिग रंगत होती. यंदा पहिल्यांदाच हा मान नाशिकला मिळाला आहे. गत तीन दशकांहून अधिक काळ वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आम्ही यशस्वी आयोजन केले आहे. यंदाची ही महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेटस प्रीमिअर लिगचे आयोजनही आम्ही यशस्वीपणे पार पाडू याची खात्री आहे.

नाशिकमधील गोल्फ क्लब मैदान, संदीप फाऊंडेशन, महात्मा नगर, बीवायके कॉलेज आदी मैदानावर ११ ते १४ मे दरम्यान वकिलांच्या संघांचे साखळी सामने तर १६ मे रोजी उपांत्य आणि १७ मे रोजी अंतिम सामना होईल. अंतिम सामन्यानंतर तत्काळ सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण केले जाईल. विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख, उपविजेत्या संघाला ३१ हजार रोख तर मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला बाईक आणि सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ फलंदाजाला ३१ हजार रोख व सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ गोलंदाज ३१ हजार व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील वकिलांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी, यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्रात आयोजित केल्या जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button