Top Newsअर्थ-उद्योग

आणखी दोन सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकारची तयारी

नवी दिल्ली : देशातील प्रमुख सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीबाबतचा मोठा निर्णय या आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देशातील दोन मोठ्या सरकारी कंपन्या विकण्याची तयारी सरकारने केली आहे. या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून पैसा उभारुन तो देशाच्या बहुपयोगी योजनांवर खर्च करण्यात येणार आहे. निर्गुंतवणूक केल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये देशातील खत आणि स्टील निर्मिती कंपन्यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार केंद्र सरकार या कंपन्यांचा हिस्सा विकून जो पैसा जमा होईल तो देशातील इतर योजनांवर खर्च करणार आहे. सरकारला कंपन्या विकून कोणताही व्यापार करायचा नाही असं याआधीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच सध्या तोट्यात असलेल्या सरकारी कंपन्या आणि काही मोठे प्लांट सरकार विकणार आहे.

खत निर्मिती क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या अर्थात एनएफएल आणि आरसीएफ या दोन कंपन्यांधील सरकार आपली भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. याशिवाय स्टील सेक्टरमधील मोठी सरकारी कंपनी एसएआयएल (स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) चे दोन मोठे प्लांट सरकार विकणार आहे. एनएफएल, आरसीएफ आणि आरसीएफमधील निर्गुंतवणुकीच्या मुद्द्यावर या आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button