अर्थ-उद्योग

गूगलवर वी २४X७ ग्राहक सेवा उपलब्ध

मुंबई : भारतातील आघाडीच्या टेलिकॉम ब्रॅंड वी ने आपल्या युजर्सना सर्वोत्तम ग्राहक अनुभव प्रदान करण्यावर सर्वाधिक भर देत गूगलच्या बिझनेस मेसेजेससोबत एकीकरण केल्याची घोषणा केली आहे. आधीच्या इतर अनेक सेवासुविधा आणि उपक्रमांप्रमाणेच ही सुविधा देखील टेलिकॉम उद्योगक्षेत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा वी ने आणली आहे. सर्व वी ग्राहकांना स्मार्टफोन्सवर २४X७ ग्राहक सेवा उपलब्ध करवून देण्यासाठी वी ने आपले वीआयसी चॅटबॉट गूगलच्या बिझनेस मेसेजेससोबत एकीकृत केले आहे.

वीआयसी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असून असिस्टेड सेवांसाठी लाईव्ह एजंट कनेक्टने सक्षम आहे, आता गूगलच्या बिझनेस मेसेजेसमध्ये देखील याचा समावेश करण्यात आला आहे.

या नाविन्यपूर्ण सुविधेमुळे वी किंवा वी स्टोर्सचा गूगलवर किंवा गूगल मॅप्सवर शोध घेणाऱ्या युजर्सना सर्च परिणामांच्या समोर ‘चॅट’ किंवा ‘मेसेज अ लाईव्ह एजंट’ असे बटन दिसते, या बटनावर क्लिक करून ते व्हर्च्युअल पद्धतीने एजंट म्हणजेच वीआयसीसोबत संपर्क साधून आपल्या प्रश्न व शंकांचे तातडीने निरसन करून घेऊ शकतात. भारतात गूगलच्या बिझनेस मेसेजेससोबत एकीकृत करणारा वी हा टेलिकॉम उद्योगक्षेत्रातील पहिला ब्रँड आहे.

गेल्या वर्षी व्हाट्सअपवर सर्विस चॅटबॉट व्हीआयसी हा क्रांतिकारी, एआय चालित डिजिटल ग्राहक सेवा आणि सहायता देणारा व्हर्च्युअल मदतनीस सादर करणारी पहिली टेलिकॉम कंपनी वी होती. व्हाट्सअपवर वीआयसीमार्फत बिलांचा भरणा आणि रिचार्जेस करण्याची सुविधा देखील वी ने नुकतीच उपलब्ध करवून दिली आहे.

वीआयसीमुळे वी ग्राहकांना त्यांच्या विविध सेवा, प्रश्न, शंकांच्या निरासनासाठी तातडीने प्रतिसाद मिळतो. बिलांचा भरणा, रिचार्जेस, मूल्यवर्धित सेवा, प्लॅन ऍक्टिव्हेशन, नवीन जोडणी, डेटा बॅलन्स, बिलासंबंधी माहिती जाणून घेणे या आणि अशा अनेक सेवा चटकन पुरवल्या जातात. वीआयसीवर संदेशांची देवाणघेवाण होते, हे वापरणे अगदी सहजसोपे, सुरक्षित आहे. यामुळे ग्राहकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शक्तीचा वापर करून वी सोबत सहज संपर्क साधणे शक्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button