बेकिंग व आरोग्यदायी कुकिंगसाठी सॅमसंगची ‘बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्ज’
मुंबई : सॅमसंग या भारताच्या सर्वात विश्वसनीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने आज बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्जच्या लाँचसह त्यांच्या किचन अप्लायन्सेस श्रेणीच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्जमध्ये स्टिमिंग, ग्रिलिंग आणि फ्राइंग अशा उद्योगक्षेत्रातील पहिल्याच वैशिष्ट्यांसोबत प्रो-लेव्हल कन्वेक्शन वैशिष्ट्ये आहेत, जी होम शेफ्स बनलेल्या आणि आरोग्यदायी आहार सेवनाची सवय अंगिकारलेल्या तरूण मिलेनियल्सचे लक्ष वेधून घेतील.
जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह या सडपातळ व स्टायलिश दिसणा-या श्रेणीमध्ये क्लीन पिंक रंगामधील मॉडेल्सचा समावेश आहे आणि हे मॉडेल्स सर्वसमावशेक होम शेफ्सना बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्जमध्ये स्वादिष्ट मिष्टान्ने, कुरकुरीत, ऑईल-फ्री स्नॅक्स आणि स्टिम डिशेस् बनवण्याची सुविधा देतात. ही सुविधा यापूर्वी फक्त उच्चस्तरीय कन्वेक्शन मायक्रोवेव्ह मॉडेल्समध्येच होती. लोक अधिकाधिक वेळ घरीच व्यतित करत असताना त्यापैकी अनेकांना कूकिंग व बेकिंगची आवड आहे. बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्ज कोणत्याही समकालीन किचनमध्ये असलेच पाहिजेत आणि ग्राहकांना त्यांच्यामधील लुप्त शेफचा शोध घेण्यामध्ये मदत करण्यासाठी परिपूर्ण आहेत.
”घरातून काम आणि घरातून शिक्षण घेण्यासोबत लोक घरी बेकिंग व नवीन पाककला करण्याचा प्रयत्न करताना दिसण्यात येत आहे. देशभरातील लोक, विशेषत: मिलेनियल्स घरी असल्याने व बाहेर खाण्यावर निर्बंध असल्यामुळे शेफ्स बनले आहेत. ग्राहकांची घरीच आरोग्यदायी व स्वादिष्ट आहार बनवण्याप्रती असलेली नवीन आवड पूर्ण करण्यासाठी आम्ही एण्ट्री लेव्हल विभागामधील उद्योगक्षेत्रातील पहिले होम डिसर्ट, स्टिम कूक व ग्रिल फ्राय वैशिष्ट्ये असलेले बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्ज सादर केले आहेत,” असे सॅमसंग इंडियाचे ऑनलाइन व्यवसाय, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ संचालक संदीप सिंग अरोरा म्हणाले.
आकर्षक व सडपातळ डिझाइन, अधिक सर्वोत्तम कंट्रोल्स, वैशिष्ट्यपूर्ण हँडल्स, ग्लास फिनिश बॉडीसह हे मायक्रोवेव्ह्ज आकर्षक दिसण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आले आहेत आणि हे मायक्रोवेह्ज आधुनिक शहरी मॉड्युलर किचन सजावटीला अगदी साजेसे आहेत.
प्रगत तंत्रज्ञान, सुधारित फंक्शन्स आणि प्रीमियम डिझाइन वैशिष्ट्यांसह सॅमसंगने नवीन बेकर सिरीजअंतर्गत पाच मॉडेल्स सादर केले आहेत – दोन ग्रिल फ्राय मॉडेल्स आणि तीन स्टिम कूक मॉडेल्स, जे २३ लिटर क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. ही श्रेणी फ्लिपकार्ट व अॅमेझॉन आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्टोअर सॅमसंग शॉपवर उपलब्ध असून किंमत १०,२९० रूपयांपासून ११,५९० रूपयांपर्यंत आहे.
बेकर सिरीज मायक्रोवेव्ह्जची वैशिष्ट्ये:
होम डिसर्ट : मायक्रोवेव्हच्या सहाय्याने एग पुडिंग, चॉकलेट मड केक, बनाना ब्रेड, ब्राऊनीज सारखी मिष्टान्ने बनवणे एका बटनाच्या क्लिकमध्ये शक्य आहे. जलद, सुलभ व स्वादिष्ट!
ग्रिल फ्राय : ग्रिल फ्राय मायक्रोवेव्ह्जमध्ये क्रस्टी प्लेट आहे, जी ग्राहकांना तेलाशिवाय तळण्याची सुविधा आणि ऑइल फ्री फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स, चीज स्टिक्स, चिकन विंग्ज, वेफर्स इत्यादींचा आस्वाद घेण्याचा आनंद देईल.
स्टिम कूक : स्टिम कूक मायक्रोवेव्ह्जसोबत स्टिम कूकर व ऑटो स्टिम फंक्शन येते, जे भाज्या, मांस, फळे, अंडी, लापशी, तांदूळ, बटाटे इत्यादी वाफवण्याची सुविधा देतात.