अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सच्या एसयूव्‍हीची स्‍पेशल काझीरंगा एडिशन लाँच

मुंबई : एसयूव्‍ही विभागामधील अग्रणी स्थिती साजरी करत टाटा मोटर्स या भारताच्‍या आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज भारताच्‍या महान राष्‍ट्रीय उद्यानांना मानवंदना म्हणून भारताच्‍या संपन्‍न भौगोलिक व जैविक विविधतेमधून प्रेरित ‘एसयूव्‍हीची अनटेम्‍ड काझीरंगा एडिशन’ लाँच केली. एसयूव्‍हीच्‍या या प्रतिष्ठित, अद्वितीय स्‍पेशल एडिशनमध्‍ये भारताची पहिली व सर्वात सुरक्षित सब कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही – पंच, भारताची पहिली जीएनसीएपी ५-स्‍टार रेटेड कार – नेक्‍सॉन, लॅण्‍ड रोव्‍हर डीएनएने युक्‍त कंपनीची प्रिमिअम एसयूव्‍ही – हॅरियर आणि त्‍यांची प्रमुख ७ आसनी एसयूव्‍ही – सफारी यांचा समावेश असेल. आजपासून बुकिंग्‍जना सुरूवात होण्‍यासह काझीरंगा एडिशन सर्व टाटा मोटर्स ऑथोराईज्‍ड डिलरशिप्‍समध्‍ये त्‍यांच्‍या संबंधित टॉप ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल.

याप्रसंगी टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे विक्री, विपणन व कस्‍टमर केअरचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजन अम्बा म्‍हणाले, ”एसयूव्‍हींप्रती कल जागतिक ट्रेण्‍ड आहे आणि हेच भारताच्‍या बाबतीत आहे. आम्‍ही आमच्‍या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रशंसा केलेल्‍या एसयूव्‍हींच्‍या आमच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीसह या ट्रेण्‍डशी संलग्‍न राहत आलो आहोत. सध्‍याची उद्योग स्थिती, तसेच बाजारपेठेमध्‍ये उपलब्‍ध असंख्‍य पर्यायांसह आम्‍हाला पहिल्‍या क्रमांकाचा एसयूव्‍ही ब्रॅण्‍ड म्‍हणून उदयास येण्‍याचा आनंद होत आहे आणि आम्‍ही ब्रॅण्‍डवर विश्‍वास दाखवण्‍यासाठी आमच्‍या सर्व ग्राहकांचे आभार मानतो. या यशस्‍वी गाथेला पुढे घेऊन जाण्‍यासाठी आम्‍हाला आपल्‍या देशातील जैवविविधतेमधून प्रेरित एसयूव्‍हींची अनटेम्‍ड काझीरंगा एडिशन सादर करण्‍याचा आनंद होत आहे. जगभरात चपळता व शक्‍तीसाठी ओळखला जाणारा एक शिंग असलेला दि ग्रेट इंडियन –हायनो काझीरंगाच्‍या प्रतीकासह ही श्रेणी आमच्‍या अस्‍सल एसयूव्‍हींच्‍या ‘गो-एनीव्‍हेअर’ डीएनएला अधिक दृढ करते. तसेच न्‍यू फॉरेव्‍हर ब्रॅण्‍ड वचनासह आम्‍ही ग्राहकांसाठी आमच्‍या एसयूव्‍ही पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणत आहोत आणि आम्‍ही आशा करतो की, हे सादरीकरण या विभागातील अग्रणी म्‍हणून आमचे स्‍थान अधिक प्रबळ करेल.

टाटा मोटर्सने नुकतेच आयपीएल चाहत्‍यांसाठी पंच काझीरंगा एडिशनचे ऑक्‍शन करण्‍याच्‍या योजनेची देखील घोषणा केली आणि विजेत्‍या बोलीमधून प्राप्‍त सर्व उत्‍पन्‍न काझीरंगामधील वन्‍यजीवनाच्‍या संवर्धनाप्रती प्रयत्‍नांसाठी दान करण्‍याचे ठरवले आहे.

काझीरंगा रेंजची परिभाषित वैशिष्‍ट्ये:

या नवीन सादर करण्‍यात आलेल्‍या रेंजमध्‍ये कार्सच्‍या एकूण डिझाइनमध्‍ये वाढ करण्‍यासाठी उत्‍साहवर्धक वैशिष्‍ट्ये आहेत. सर्व मॉडेल्‍समध्‍ये ग्रासलॅण्‍ड बिज एक्‍स्‍टीरिअर बॉडी कलरसह पियानो ब्‍लॅक फिनिशमधील ड्युअल टोन छत आहे. अर्थी बिज लेदरेट अपहोल्‍स्‍टरी व ट्रॉपिकल वूड डॅशबोर्डसोबत इंटीरिअर्समधील विविध अर्थी बिज रंगाचे इन्‍सर्टस् कार्सना अधिक थीमॅटिक बनवतात, इंटीरिअर्सना आकर्षक फिलसह सुशोभित करतात. तसेच पुढील हेडरेट्सवरील (सफारीमध्‍ये दुस-या रांगेत देखील) एकमेकांचा सामना करणा-या दोन गेंड्यांची नक्षीदार कलाकृती आणि फ्रण्‍ट फेण्‍डरवर नवीन सॅटिन ब्‍लॅक -हायनो मस्‍कटची भर टाटा मोटर्सच्‍या अस्‍सल एसयूव्‍हींच्‍या ‘गो-एनीव्‍हेअर’ वृत्तीला दाखवतात, तसेच मस्‍कटच्‍या प्रबळ कणखरतेला दाखवतात.

अनटेम्‍ड काझीरंगा रेंज बाबत:

टाटा पंच काझीरंगा एडिशन

भारताची पहिली व सर्वात सुरक्षित सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही – टाटा पंचला नवीन अर्थी बिज लेदरेट अपहोल्‍स्‍टरी, पियानो ब्‍लॅक डोअर ट्रिम, अर्थी बिज ट्राय-अ‍ॅरो फिनिश डॅशबोर्ड मिड पॅड, ग्रॅनाईट ब्‍लॅक रूफ रेल्‍स, पियानो ब्‍लॅक ह्युमॅनिटी लाइन फ्रण्‍ट ग्रिल आणि जेट ब्‍लॅक १६ इंच अलॉइ व्‍हील्‍ससह आकर्षक घटकांचे लुक देण्‍यात आले आहे. ही काझीरंगा एडिशन टॉप पर्सोना क्रिएटिव्‍ह एमटी, क्रिएटिव्‍ह एमटी-आयआरए, क्रिएटिव्‍ह एएमटी आणि क्रिएटिव्‍ह एएमटी-आयआरएमध्‍ये उपलब्‍ध असेल.

टाटा नेक्‍सॉन काझीरंगा एडिशन

नेक्‍सॉनच्‍या नवीन अवतारामध्‍ये ड्रायव्‍हर व सह-ड्रायव्‍हरसाठी वेन्टिलेटेड आसनांची भर करण्‍यात आली आहे. विचारपूर्वक भर करण्‍यात आलेले एअर-प्‍युरिफायर केबिनमधील प्रवास आरामदायी व सुरक्षित करते. ड्रायव्‍हरला अधिक सुविधा देण्‍यासाठी नवीन इलेक्‍ट्रो-क्रोमॅटिक आयआरव्‍हीएम या व्‍हर्जनमध्‍ये सादर करण्‍यात आले आहे. तसेच नेक्‍सॉन काझीरंगामध्‍ये ड्युअल टोन अर्थी बिज लेदरेट अपहोल्‍स्‍टरी, पियानो ब्‍लॅक डोअर ट्रिम्‍स, ट्रॉपिकल वूड फिनिश डॅशबोर्ड मिड-पॅड, ग्रॅनाईट ब्‍लॅक बॉडी क्‍लॅडिंग्‍ज व रूफ रेल्‍स, पियानो ब्‍लॅक ह्युमॅनिटी लाइन फ्रण्‍ट ग्रिल आणि जेट ब्‍लॅक १६ इंच अलॉइ व्‍हील्‍स असतील. नेक्‍सॉन काझीरंगा एडिशन दोन ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल – पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्‍स, नेक्‍सॉन एक्‍सझेड+ (पी) आणि नेक्‍सॉन एक्‍सझेडए+ (पी).

टाटा हॅरियर काझीरंगा एडिशन

टाटा मोटर्सची प्रिमिअम एसयूव्‍ही – हॅरियरमध्‍ये आता ड्रायव्‍हर व सह-ड्रायव्‍हरसाठी वेन्टिलेटेड आसनांच्‍या भरसह सुधारित आकर्षकतेची भर करण्‍यात येईल. विचारपूर्वक भर करण्‍यात आलेले एअर-प्‍युरिफायर केबिनमधील प्रवास आरामदायी व सुरक्षित करते. या वेईकलमध्‍ये अनेक नवीन कनेक्‍टेड कार तंत्रज्ञानांसह (आयआरए कनेक्‍टेड कार टेक्‍नोलॉजी, रिमोट कमांड्स, लोकेशन बेस्‍ड सर्विसेस, ओव्‍हर दि एअर अपडेट्स, लाइव्‍ह वेईकल डायग्‍नोस्टिक्‍स व गेमिफिकेशन) वायफायवर अॅप्‍पल कार प्‍ले व अँड्रॉईड ऑटो असेल. ड्युअल टोन अर्थी बिज लेदरेट अपहोल्‍स्‍टरी, ट्रॉपिकल वूड फिनिश डॅशबोर्ड मिड-पॅड, ग्रॅनाईट ब्‍लॅक बॉडी क्‍लॅडिंग्‍ज, ग्रॅनाईट ब्‍लॅक फ्रण्‍ट ग्रिलसह पियानो ब्‍लॅक इन्‍सर्टस् आणि जेट ब्‍लॅक १७ इंच अलॉई व्‍हील्‍स यासह काझीरंगा एडिशनमधील हॅरियर दोन ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल – हॅरियर एक्‍सझेड+ आणि हॅरियर एक्‍सझेडए+.

टाटा सफारी काझीरंगा एडिशन

टाटा मोटर्सची प्रमुख एसयूव्‍ही – सफारी तिच्‍या विभागामधील सर्वात वैशिष्‍ट्य संपन्‍न वेईकल आहे. टॉप ट्रिममध्‍ये उपलब्‍ध वैशिष्‍ट्ये जसे पहिल्‍या व दुस-या रांगेत वेण्टिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, वाय-फायवर अॅप्‍पल कारप्‍ले / अँड्रॉईड ऑटो, एअर प्‍युरिफायर, आयआरए यांसह सफारी काझीरंगामध्‍ये ड्युअल टोन अर्थी ब्रिज लेदरेट सीट्स व डोअर ट्रिम्‍स, ट्रॉपिकल वूड फिनिश डॅशबोर्ड मिड-पॅड, ग्रॅनाईट ब्‍लॅक बॉडी क्‍लॅडिंग्‍ज, ग्रॅनाईट ब्‍लॅक फ्रण्‍ट ग्रिल व रूफ रेल्‍ससह पियानो ब्‍लॅक इन्‍सर्टस् आणि जेट ब्‍लॅक १८ इंच अलॉई व्‍हील्‍स असतील. सफारीमधील हे एडिशन ४ ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल – एक्‍सझेड+ ७एस, एक्‍सझेडए+ ७एस, एक्‍सझेड+ ६एस, एक्‍सझेडए+ ६एस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button