Top Newsस्पोर्ट्स

कोणाचेही मन न दुखावणारा खेळाडू

- अ‍ॅड. अल्केश कदम, रत्नागिरी

– अ‍ॅड. अल्केश कदम

नाशिक आणि विवेकानंद जगदाळे माझ्यासाठी नेहमीच लकी ठरले आहेत. यंदा तर त्यांच्यामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यानिमित्ताने नाशिकमध्ये येणार आहेत. असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडते आहे. मी पहिल्यांदा २०१३ मध्ये पुण्यात मॅचेस खेळल्या तेव्हा आमची टीम स्ट्राँग असूनही दुसऱ्या राऊंडला आम्ही बाहेर पडलो होतो… पुढच्या वर्षी २०१४ मध्ये नाशिकला मॅचेस खेळल्या तर थेट फायनलपर्यंत पोहोचलो… जेव्हा जेव्हा नाशिकला खेळलो तेव्हा तेव्हा जिंकलो… नाशिक तर लकी ठरलेच पण त्याहीपेक्षा जगदाळे आमच्यासाठी लकी आहेत. तसे मला २०१२ पासूनच त्यांच्यासोबत खेळण्याचा योग आला. वकील क्रिकेटमध्ये आता ख्याती अशी झाली आहे की, महाराष्ट्रात कुणीही मॅचेस घ्यायच ठरवलं आणि ऐनवेळी माघार घेतली तर ते काम जगदाळे यांच्याकडून पूर्ण होते. त्यांनी फक्त वकिलांच्या मॅचेससाठीच नाही तर दुर्गम अशा सातपुडा भागातील वकिलांना क्रिकेट किट आणि इतरही मदत केली आहे. याशिवाय अनेक टीमची ‘एन्ट्री फी’ माफ करणे, खेळाडूंच्या राहण्या-जेवण्याची चांगली व्यवस्था करणे यासह इतर अनेक गोष्टी विनातक्रार पुरवलेल्या आहेत. याचा त्यांनी कुठेही गवगवा केलेला नाही. स्वत: बॅकफूटवर राहून दुसºयाचे मन दुखावणार नाही याची ते काळजी घेतात. या आधी पुण्यात झालेल्या ‘एमएपीएल’मध्ये आठच टीम ओनर होते… कमी टीम असल्याने अनेकांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अनेकांच्या इच्छेनुसार जगदाळे यांनी अधिकाधिक वकिलांना यात सामावून घेण्याकरीता यंदाच्या सिझनमध्ये तब्बल १६ टीम मालक उभे केले, ही आमच्या सर्वांसाठीच मोठी अचिव्हमेंट आहे. ‘ऑलवेज थिंक बिग’ अशी त्यांची मानसिकता असल्याने त्यांनी या टीम डबल केल्या… यामुळे महाराष्ट्रातील जवळपास ३०० ते ४०० वकिलांना यंदा नाशिकमध्ये खेळायला मिळाले आहे. एवढी मोठी जबाबदारी पेलणे खरोखरच अवघड आहे. आपल्यासमोरचे आव्हान, प्रसंगी होणारी टीका, अडचणी, राग, लोभ सगळें काही स्वीकारुन जगदाळेसाहेब अत्यत शांतपणाने सर्वांना सामोरे जातात, हीच त्यांची खासियत आहे.

मला यावर्षी एकच दु:ख आहे की, मी यंदा जगदाळेंच्या पन्हाळा पँन्थर या टीममध्ये खेळू शकत नाही. पन्हाळा पॅन्थर ही माझी आवडती टीम आहे. त्यांच्या टीममध्ये असलो की तिथे सगळे फक्त खेळाडू असतात. कोणीही सिनियर वा ज्युनियर असत नाही. ते सर्वांना समान संधी देतात, त्यांच्यासोबत असण्याचाच आनंद मोठा असतो. अशाप्रकारच्या वकिलांच्या क्रिकेट मॅचेसमुळे महाराष्ट्रातीलच नाही तर परराज्यातील वकील मंडळीही मित्रत्वाच्या नात्याने व्यवसायात जोडले गेलो आहे. आम्हाला परजिल्ह्यातील एखादी केस असेल तरी आता निश्चिती असते की, तिथले वकील मित्र आमच्यासाठी वेळ देतील आणि आपले काम प्राधान्याने पूर्ण करतील. अगदी पक्षकारांनाही आम्ही विश्वासाने आमच्या कुठल्याही वकीलमित्राचा संदर्भ देवू शकतो. फक्त वकिलीच नाही तर इतर अनेक कारणाने आम्ही आज व्यवसायापलीकडे बांधले गेलो आहोत यात जगदाळे यांचा मोठा वाटा आहे हे निश्चितच. अभिमानाने सांगू शकतो की, या टुर्नामेंटमुळे अनेक मित्र मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button