इतर

विकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल) विकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या . तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आलीय. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहेय

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?
सुपरमार्केट, डी-मार्ट, बिग बाझार, रिलायन्स उघडे राहणार का ?
कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 4 आणि 5 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार आहे. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील.

विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील काय बंद राहणार ?
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.

विकेंड लॉकडाऊन दरम्यान नेमकं काय सुरु आणि काय बंद असेल याबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. सर्वसामान्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.

1) डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?

उत्तर : राज्य सरकारने 4 आणि 5 एप्रिल रोजी निर्बंधांबाबत आदेश जारी केले आहेत. जी दुकाने, मॉल्स आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील.

2) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (वीकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?

उत्तर : ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

3) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (वीकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?

उत्तर : कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे

4) बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?

उत्तर : बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील

5) वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?

उत्तर : वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

6) केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?

उत्तर : नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

7) नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?

उत्तर : हो. नागरिक हे 4 एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

8) मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?

उत्तर : नाही.

9) रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?

उत्तर : हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

10) इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

उत्तर : नाही.

11) दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?

उत्तर : नाही.

12) आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील?

उत्तर : हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

13) आठवड्याच्या शेवटी रात्री 8 नंतर किंवा सकाळी 7 च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button