आरोग्य

कोविड-१९ लसीकरण तुमच्‍या सर्व शंकांसाठी उपयुक्‍त मार्गदर्शन

- डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटीकल केअर विभाग, फोर्टिस हॉस्पिटल्‍स आणि सदस्‍य, कोविड टास्‍कफोर्स

आपण जगातील सर्वात मोठ्या लसीकरण उपक्रमाच्‍या दुस-या टप्‍प्‍यामध्‍ये प्रवेश केला आहे. पण, समोर येत असलेल्‍या अनेक शंकांमुळे या उपक्रमाच्‍या यशावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि कोविड-१९ विरोधातील लढा कमकुवत होऊ शकतो.

होय, लसीकरण कोविड-१९ महामारीविरोधातील लढ्यासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. लसीकरणामुळे जनजीवन सुरळीत करण्‍याच्‍या आपल्‍या मिशनला यशस्‍वी होण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते. असे असले तरी, भारतातील कोविड-१९ लसीकरण मोहिमेला पहिल्‍या दिवसापासूनच गती मिळाली आहे. नागरी संस्‍थांकडून उत्‍साही प्रतिसादासह आपण हळूहळू, पण स्थिर गतीने आपल्‍या लक्ष्‍य ध्‍येयांकडे वाटचाल करत आहोत. आरोग्‍यसेवा देणारे कर्मचारी आणि प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेल्‍या कर्मचा-यांच्‍या लसीकरणाच्‍या टप्‍प्‍याला यश मिळाल्‍यानंतर आपण आता ६० वर्षांवरील ज्‍येष्‍ठ नागरिक आणि कोमोर्बिडीटीज असलेल्‍या ४५ वर्षांवरील व्‍यक्‍तींचे लसीकरण व संरक्षण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

तुम्‍हा स्‍वत:ला व तुमच्‍या प्रियजणांचे लसीकरण करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये साह्य करणारी मार्गदर्शकतत्त्वे:

१. सर्व प्रौढ व्‍यक्‍तींनी कोविड-१९ लस घ्‍यावी आणि इतरांना देखील लस घेण्‍यास प्रोत्‍साहित करावे.

२. लसीकरणापूर्वी आहार सेवन करावा आणि शरीराला हायड्रेटेड ठेवावे.

३. कोणत्याही लससंदर्भात अॅनाफिलॅक्सिस (अ‍ॅलर्जिक रिअॅक्‍शन) असलेल्‍या व्‍यक्‍तींनी लस घेऊ नये.

४. कोविशिल्‍ड व कोव्‍हॅसिक्‍नसह सर्व मान्‍यताकृत लसींमध्‍ये पुढील बाबी आहेत;

कोविड-१९ मुळे होणा-या मृत्‍यूला प्रतिबंध करण्‍याची १०० टक्‍के कार्यक्षमता
गंभीर कोविड-१९ विरोधात अत्‍यंत उच्‍च कार्यक्षमता
लक्षणे असलेल्‍या कोविड-१९ विरोधात उच्‍च ते मध्‍यम कार्यक्षमता (६० टक्‍के ते ९५ टक्‍के)
फक्‍त लक्षणे नसलेल्‍या कोविड-१९ विरोधात कमी कार्यक्षमता
५. ६० वर्षांवरील ज्‍येष्‍ठ नागरिक आणि कोमोर्बिडीटीज असलेले ४५ वर्षांवरील व्‍यक्‍ती अशा उच्‍च धोका असलेल्‍या असुरक्षित व्‍यक्‍तींच्‍या लसीकरणामुळे मृत्‍यूचे प्रमाण ‘अत्‍यंत कमी’ होईल. सध्‍या या वयोगटातील ९० टक्‍के रूग्‍ण आजाराने पीडित आहेत. म्‍हणून, आपण या वयोगटातील व्‍यक्‍तींना लसीकरण करून घेण्‍यास प्रोत्‍साहित केले पाहिजे.

६. पूर्वी कोविड-१९ संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तींनी कोविड-१९ मधून बरे झाल्‍याच्‍या ८ ते १२ आठवड्यांनंतर लस घ्‍यावी.

७. पूर्वी कोविड-१९ संसर्गाच्‍या उपचारासाठी प्‍लाझ्मा थेरपी करण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तींनी लस घेण्‍यापूर्वी ८ ते १२ आठवडे प्रतिक्षा करावी.

८. उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, रेनल फेल्युअर व हार्ट डिसीज असलेल्‍या रूग्‍णांसाठी, तसेच बायपास, पोस्‍ट-एंजिओग्राफी झालेले आणि डायलिसिस उपचार घेत असलेल्‍या रूग्‍णांसाठी लस सुरक्षित आहे.

९. गरोदर महिलांसंदर्भात, लसीच्‍या धोक्‍यांपेक्षा लाभ अधिक असतील तर तुम्‍ही लस घेतली पाहिजे. उदाहरणार्थ प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणा-या गरोदर महिला कर्मचारीने लस घेतली पाहिजे.

१०. लसीकरणानंतर प्रसूतीकाळ किती लांब टाळावा याबाबत कोणतीच माहिती नाही. पण, हा निष्क्रिय किंवा मृत विषाणू असल्‍यामुळे लसीकरणाच्‍या ६ ते ८ आठवड्यांनंतर गरोदर राहणे सुरक्षित आहे.

११. फूड अ‍ॅलर्जी, औषधांची अ‍ॅलर्जी (लस घटकांपेक्षा इतर) आणि दमा, अ‍ॅलर्जिक –हायनायटिस व अ‍ॅलर्जिक डर्माटिटिस अशा सामान्‍य अ‍ॅलर्जिक आजारांनी पीडित व्‍यक्‍तींसाठी लस सुरक्षित आहे.

१२. अस्‍पायरिन व क्‍लोपिडोग्रेल सारखे अॅण्‍टी-प्‍लेटलेट एजंट्सनी पीडित व्‍यक्‍तींनी त्‍यांचा औषधोपचार न थांबवता कोविड-१९ लस घ्‍यावी.

१३. वॉरफरिन सारखे ब्‍लड थिनर्स किंवा नवीन अॅण्‍टीकोग्‍युलेशन एजंट्सने पीडित व्‍यक्‍तींना इंजेक्‍शन घेतल्‍याच्‍या जागी सूज येण्‍याचा कमी धोका आहे. या नवीन एजंट्सने पीडित रूग्‍ण त्‍यांचे सकाळचे डोस वगळू शकतात, लस घेऊन पुढील नियमित डोस सुरू ठेवू शकतात.

१४. स्‍ट्रोक, पार्किसन्‍स, डिमेन्शिया सारख्‍या न्‍यूरोलॉजिकल आजारांनी पीडित व्‍यक्‍तींनी लस घ्‍यावी, कारण लस त्‍यांच्‍यासाठी सुरक्षित आहे.

१५. कोणत्‍याही प्रकारचे इम्‍यूनोसप्रीसण्‍ट्स झालेले रूग्‍ण (म्‍हणजेच अवयव प्रत्‍यारोपण झालेले रूग्‍ण) सुरक्षितपणे लस घेऊ शकतात. पण, रोगप्रतिकारशक्‍ती क्षमता पूर्ण होऊ शकणार नाही. नोंदणी करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

१६. लस घेतल्‍यानंतर मद्यपान करू नये किंवा लस घेतल्‍यानंतर नपुंसकत्व येते किंवा लस घेतल्‍यानंतर व्‍यक्‍तीच्‍या डीएनएमध्‍ये बदल होईल, हे सर्व चुकीचे आहे.

१७. सध्‍या मुलांवरील कोणतीही चाचणी उपलब्‍ध नाही. म्‍हणून, सध्‍या १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण लांबवता येऊ शकते.

१८. कर्करोगाने पीडित, तसेच केमोथेरपी घेत असलेल्‍या रूग्‍णांनी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा आणि केमोथेरपी चक्रांदरम्‍यान लसीकरणासाठी योग्‍य वेळ निश्चित करावी. सामान्‍यत: रूग्‍णाने लसीकरणासाठी केमोथेरपीनंतर किमान ४ आठवडे प्रतिक्षा करावी.

१९. लसीकरणानंतर ताप येणे, अंगदुखी, चक्‍कर येणे, डोकेदुखी ही सामान्‍य लक्षणे आहेत.

२०. गरज असल्‍यास लसीकरणानंतर पॅरासिटामोल गोळी घेता येऊ शकते आणि बहुतांश लक्षणे उत्तमरित्‍या नियंत्रणात येतील.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका. योग्‍य माहिती मिळण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे कोविड-१९ लसीकरण करत असलेल्‍या वैद्यकीय केंद्रांमधील डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करा. लक्षात ठेवा, व्‍हॅक्सिन-इंड्युस इम्‍युनिटी ही हर्ड इम्‍युनिटी इतकीच महत्त्वाची आहे. लसीकरण हे विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाशी सामना करण्‍याकरिता सध्‍याचा एकमेव उपाय आहे. चला तर मग, सर्वांनी एकत्र येऊन लढूया आणि महामारीचे निर्मूलन करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button