स्पोर्ट्स

पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी; २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस

मुंबई : मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यानं ( Mumbai Captain Prithvi Shaw) विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत आणखी एक धडाकेबाज खेळी केली. त्यानं उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. विजय हजारे चषक स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आज त्यानं नावावर केला. त्यानं मयांक अग्रवालचा ( ७२३ धावा, २०१८) विक्रम मोडला. पृथ्वीनं १२२ चेंडूंत १७ चौकार व ७ षटकारांच्या मदतीनं १६५ धावांची वादळी खेळी केली. यंदाच्या मोसमात पृथ्वीनं तिसऱ्यांदा १५०+ धावांची खेळी केली. पृथ्वीनं फक्त चौकार षटकारांनी २४ चेंडूंत ११० धावांचा पाऊस पाडला. पृथ्वी बाद झाला तेव्हा मुंबईनं ४१ षटकांत ४ बाद २४७ धावा केल्य होत्या.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईला यशस्वी जैस्वाल ( ६) च्या रुपानं धक्का बसला. पण, पृथ्वी फॉर्मात दिसला. त्यानं ७९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीतील त्याचे हे चौथे शतक ठरले आणि त्यानं यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या देवदत्त पडीक्कल ( ६७३ धावा) यालाही मागे टाकले. आदित्य तरे १६ धावा करून माघारी परतल्यानंतर पृथ्वीनं तिसऱ्या विकेटसाठी एस मुलानीसह मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावा जोडल्या. मुलानी ७१ चेंडूंत ४५ धावा करून माघारी परतला. त्यापाठोपाठ पृथ्वीही तंबूत परतला.

पृथ्वीच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ आणि विराट कोहलीनं २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर आहे. त्यानं या मोसमात पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसन २१२*, यशस्वी जैस्वाल २०३, कर्ण कौशल २०२, वेंकटेश अय्यर १९८, रविकुमार समर्थ १९२, अजिंक्य रहाणे १८७ आणि पृथ्वी शॉ १८५* असा क्रमांक येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button