Top Newsमुक्तपीठस्पोर्ट्स

नाशिकमध्ये Nashik महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेट्स प्रिमिअर लिग (MAPL) चे आयोजन

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता Dipankar Dutta यांच्याहस्ते शनिवारी उद्घाटन

राज्यातील ५०० वकिलांचा सहभाग

नाशिक : नाशिक Nashik जिल्हा क्रिकेट अँड स्पोर्टस् असोसिएशन, स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन आणि नाशिक बार असोसिएशनच्या Nashik Bar Associationसंयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये यंदा प्रथमच ११ ते १७ मे या कालावधीत ‘महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेटस प्रीमिअर लिग, नाशिक २०२४’चे Maharashtra Adocates Premier League 2024 आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे MAPL उद्घाटन शनिवार, दि. ११ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता, उच्च न्यायालयाचे न्या. मकरंद कर्णिक, न्या. किशोर संत, न्या. सारंग कोतवाल, न्या. संदीप मोरे, न्या. गोविंद सानप, न्या. शिवकुमार दिगे, जिल्हा प्रधान व सत्र न्या. श्रीचंद जगमलानी, तसेच संदीप युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. संदीप झा आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाचा शानदार कार्यक्रम संदीप फाऊंडेशनच्या मैदानावर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्यावतीने अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी दिली.

या स्पर्धेची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितिन ठाकरे, तसेच आयोजन समितीचे पदाधिकारी अ‍ॅड. राजाभाऊ ठाकरे, अ‍ॅड. दीपक ढिकले, अ‍ॅड. योगिनी बाबर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना अ‍ॅड. जगदाळे यांनी सांगितले की, नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलात १७ मार्च २०२४ रोजी या लिगमधील खेळाडूंच्या निवडीसाठी ऑक्शनचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमधून महाराष्ट्रातील १६ संघमालकांनी जवळपास ३५० वकील खेळांडूसाठी बोली लावली आणि आपले संघ निश्चित केले. नाशिकमधील गोल्फ क्लब मैदान, संदीप फाऊंडेशन, महात्मा नगर, बीवायके कॉलेज आदी मैदानावर ११ ते १४ मे दरम्यान वकिलांच्या संघांचे साखळी सामने तर १६ मे रोजी उपांत्य आणि १७ मे रोजी अंतिम सामना होईल. अंतिम सामन्यानंतर संदीप फाऊंडेशनच्या मैदानावर दुपारी १ वाजता बक्षिस वितरण होणार आहे. विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख, उपविजेत्या संघाला ३१ हजार रोख तर मालिका वीर खेळाडूला बाईक आणि सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ फलंदाजाला ३१ हजार रोख व सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ गोलंदाज ३१ हजार व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील वकिलांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी, यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्रात आयोजित केल्या जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

यावेळी पहिल्यांदाच महिला वकिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमधील सुमारे १०० महिला वकिलांनी यासाठी नोंदणी केली आहे. हे सामने संदीप फाऊंडेशनच्या मैदानावर दि. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खेळले जाणार आहेत. संदीप फाऊंडेशनच्या मैदानावर दि. १२ मे रोजी न्यायाधीश आणि वरिष्ठ वकिलांमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना आयोजित करण्यात आला आहे. बार आणि बेंचमध्ये सलोखा निर्माण व्हावा, यासाठी हा सामना खेळला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

‘ऑल राऊंडर’चे प्रकाशन होणार

महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेटस प्रीमिअर लिग २०२४ (एमएपीएल) च्या चौथ्या पर्वाचे यजमानपद यंदा नाशिकला मिळाले आहे. नाशिकमध्ये वकिली व्यवसायात २८ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या तसेच स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन आणि नाशिक जिल्हा क्रिकेट अँड स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी आजवर वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेकरीता दिलेल्या योगदानाचा परिचय करून देणाºया ‘आॅल राऊंडर’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या विशेषांकाचे संपादन, संकलन अ‍ॅड. योगिनी विजय बाबर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button