आरोग्यस्पोर्ट्स

महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. निर्मल कौर या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांना १९ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचं २० मे रोजी समोर आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर चंदीगढच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जून रोजी मिल्खा सिंग यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. पंतप्रधानांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या खेळाडूंना आशीर्वाद व प्रेरणा मिळविण्यासाठी लवकरच परत येईल अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली होती.

मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचं २० मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र त्यांना २४ तारखेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. फ्लाइंग सिख नावानं प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचं वय ९१ वर्षे आहे. माहितीनुसार सर्वात आधी मिल्खा सिंग यांच्या एका हेल्परला ताप आला होता. त्यानंतर मिल्खा सिंग यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मिल्खा सिंग यांनी स्वत:ला घरात क्वारंटाईन केलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button