स्पोर्ट्स

जसप्रीत बुमराह कोणत्या मॉडेलसोबत बोहल्यावर चढणार?

मुंबई: वेगवान गोलंदाज आणि भारतीय क्रिकेटर स्टार जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्याची होणारी पत्नी कोण असणार? बुमराहची लकी गर्ल कोण याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला होता. दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत तो विवाह करणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. वेगवान गोलंदाज बुमराह स्पोर्ट ऍकर आणि मॉडल असलेल्या या तरुणीसोबत लग्नगाठ बंधणार आहे.

जसप्रीत बुमराह 14-15 मार्चला विवाहबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध मॉडेल आणि स्पोर्ट ऍकर संजना गणेशनसोबत लग्न करण्यार असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनीही अद्याप ते कुठे भेटले किंवा हा निर्णय कसा घेतला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. बुमराह गोव्यामध्ये विवाह करणार असल्याची चर्चा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या चौथ्या सामन्यातून बुमराहने माघार घेतली होती. वैयक्तीक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. बुमराहने माघार घेतल्यानंतर त्याच्या लग्नासंदर्भातील चर्चा सुरू झाल्या होत्या. भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-1ने विजय मिळवला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिजमधून देखील जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला आहे. 28 वर्षीय संजना गणेशन ही स्पोर्ट अँकर आहे. ती काही काळ बर्‍याच स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती. आयपीएलमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त ती स्टार स्पोर्ट्सशीही संबंधित आहे. संजना कोलकाता नाईट रायडर्सची अँकर म्हणून काम करत आहे. संजनाने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियस होण्याचा मान मिळवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button