लाईफस्टाईल

ओरिफ्लेमने जिओर्डानी गोल्डची निरोगी चमक देणारी आकर्षक उत्पादने

मुंबई : ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रॅंडने नेहमी अशी दर्जेदार उत्पादने बनवली आहेत, जी निसर्ग-प्रेरित असून त्यात विज्ञानाचे सामर्थ्य असते. जगातील अत्यंत खास अशा घटकांपासून उत्पादने तयार करणारी जिओर्डानी गोल्ड म्हणजे ओरिफ्लेमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या ब्रॅंडने जिओर्डानी गोल्ड डिव्हाइन टच कुशन फाऊंडेशन आणि जिओर्डानी गोल्ड आयकॉनिक मस्करा ही दोन नवीन उत्पादने लॉन्च केली आहेत.

जिओर्डानी गोल्ड डिव्हाइन टच कुशन फाऊंडेशनचा मोरपीशी स्पर्श तुमच्या त्वचेला मॅट लेयरसह निरोगी चमक प्रदान करतो. त्यामध्ये हायल्युरॉनिक अॅसिड असते, जे तरुण त्वचेला साहाय्यक असते. तसेच नैसर्गिक अर्क असलेले स्किनचेरीश ब्लेन्ड त्वचेला पोषण पुरवतात.

जिओर्डानी गोल्ड आयकॉनिक मस्करा हा क्लासिक ऑफरिंगची साक्ष पटवतो. तुम्हाला अधिक स्वरूपवान बनवणारा हा मस्करा पापण्यांची लांबी आणि दाटपणा वाढल्याचा आभास देतो. याच्या वापरामुळे पापण्यांचे केस सुटे सुटे आणि सुंदर वळलेले दिसतात. हा अद्भुत लुक १९ तासांपर्यंत तुकून राहतो. व्हिटामिन सीने समृद्ध अशा फर्गेट-मी-नॉट अर्काने बनवलेला हा फॉर्म्युला तुमच्या पापण्यांचे पोषण करून त्यांचे नुकसानापासून संरक्षण करतो आणि तुमच्या पापण्यांना दाट काळा रंग आणि मुलायम फील देतो.

ओरिफ्लेम साऊथ एशिया, प्रादेशिक मार्केटिंगचे वरिष्ठ संचालक श्री. नवीन आनंद म्हणाले, “ओरिफ्लेमला जिओर्डानी गोल्डविषयी नेहमीच अभिमान वाटतो कारण ते उत्कृष्टतेचे प्रतीक आहे आणि त्यांची पाळंमुळं लक्झरीच्या दशकांमध्ये पसरलेली आहेत. सुंदर, आलीशान अनुभवाची हमी देणारी दोन नवी उत्पादने लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जिओर्डानी गोल्ड डिव्हाइन टच कुशन फाऊंडेशन तुम्हाला देते या आधी कधीच अनुभवली नसेल अशी अचूकता. आयकॉनिक ग्रँड मस्करा तुमच्या पापण्यांना देतो सुंदर लांबी आणि दाटपणा आणि याच्यामुळे पापण्यांचे केस सुटे सुटे आणि वळणदार दिसतात. आम्हाला खात्री आहे की, ही उत्पादने तुमच्या दररोजच्या ब्युटी रुटीनमध्ये वाढ करून तुम्हाला आनंदाच्या सुंदर क्षणांचा अनुभव देतील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button