भारताची हरनाज संधू नवी ‘मिस युनिव्हर्स’
नवी दिल्ली : भारताची सौंदर्यवती हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला असून तब्बल २१ वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे. २१ वर्षीय हरनाज मूळ पंजबाची रहिवाशी असून यापूर्वी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला.
https://twitter.com/Senyora/status/1470227026045030404
भारताच्या हरनाजने ७० वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावत देशाची मान जगात उंचावली आहे. भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत दोनवेळा ताज मिळवला आहे. सर्वप्रथम १९९४ मध्ये सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला. त्यानंतर, लारा दत्ताने २००० साली हा किताब जिंकला. त्यानंतर, आता २१ वर्षांनी हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे.
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर् करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.
हरनाज स्टेजवरच भावुक
मिस युनिव्हर्स होणं हे जवळपास प्रत्येक तरुणीचं स्वप्न असेल. मात्र, इथपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण, खडतर आणि तितक्याच संघर्षाचा असतो. मिस युनिव्हर्स म्हणून नाव घोषित होताच हरनाज कौरच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं.
एका प्रश्नाच्या उत्तरामुळे हरनाझ ठरली ‘मिस युनिव्हर्स’
मिस युनिव्हर्सचा किताब पटकावण्यासाठी फक्त सौंदर्याची गरज नसते. तर बुद्धी आणि कैशल्याची देखील नितांत गरज असते. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावण्यासाठी अखेरीस एक प्रश्न विचारण्यात येतो. हरनाझ कौर संधूला देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचं उत्तर हरनाझ कौर संधू तितक्याचं चातुर्याने दिलं. विश्वसुंदरीला विचारण्यात आलेला प्रश्न, ‘ सध्याच्या यंग महिला कोणता प्रेशर फेस करतायत आणि त्यांना तू काय मार्गदर्शन करशील?’
या प्रश्नावर हरनाझ कौर संधूने दिलेलं सुंदर उत्तर… हरनाझ म्हणाली, युवकांवर सगळ्यात मोठं प्रेशर आहे तो म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणं…दुस-याशी तुलना करणं सोडून द्या. स्वत:बद्दल बोला. कारण तुमच्या आयुष्याचे तुम्हीच लीडर आहात तुम्हीच तुमचा आवाज आहात…मी माझ्यावर विश्वास ठेवते आणि म्हणूनच मी आज या मंचावर आहे.