ओरिफ्लेमची लव्ह नेचर डार्क बेरीज डिलाइट श्रेणी
मुंबई : ऑरिफ्लेम या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रॅण्डच्या स्थापनेपासूनच निसर्गाला एक अत्यावश्यक घटक म्हणून आपल्या नीतिमूल्यांमध्ये सामावून घेतले आहे. ओरिफ्लेमने आपल्या लव्ह नेचर उत्पादन मालिकेतील उत्पादनांमध्ये आता थेट स्वयंपाकघरातील गोष्टींपासून प्रेरणा घेत बनविलेल्या आणि तुमच्या त्वचेवर व संवेदनांवर थेट प्रभाव टाकणा-या लव्ह नेचर डार्क बेरीज डिलाइट या नव्या रेंजची भर घातली आहे.
सैंद्रीय अर्क आणि जैव-विघटनशील धुवून टाकण्याचे घटक यांचा वापर असलेल्या या उत्पादन मालिकेमध्ये योगर्ट फेस क्रीम, फेस स्क्रब मार्मलेड आणि फेस मास्क स्मूदी यांचा समावेश आहे. संवेदना चेतविणारा स्वादिष्ट सुगंध आणि जॅम व दह्यासारखा आनंददायी स्पर्श लाभलेली ही उत्पादने ब्लॅकबेरी, ब्लूबेरी आणि योगर्ट एक्स्ट्रॅक्ट्सपासून बनली आहेत.
लव्ह नेचर डार्क डिलाइट फेस स्क्रब मार्मलेड हा एक मऊ मुलायम फेस स्क्रब असून त्यात ऑर्गेनिक ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरीजचा अर्क व घर्षणाने त्वचेवरील मृत पेशी काढून टाकणा-या ब्लॅककरन्ट बियांचा समावेश आहे. बेरीचा सुगंध असलेल्या या जैव-विघटनशील मिश्रणुळे त्वचा ताजीतवानी होते आणि ती मऊ व तेजस्वी बनते. लव्ह नेचर डार्क बेरीज डिलाइट फेस मास्क स्मूदी तुमच्या त्वचेचे पोषण करते, तिला शांत करते आणि मऊ मुलायम बनवते. याचा वाइप-ऑफ फॉर्म्युला त्यातील बेरीच्या सुखद सुवासासह त्वचेचे लाड पुरवितो.
ऑरिफ्लेमचे प्रवक्ता म्हणाले, पोषक घटकांनी समृद्ध डार्क बेरीज आणि मलईदार दह्याच्या संवेदना जागा करणारा स्पर्श आणि ताजेतवाने करणारा सुगंध ग्राहकांच्या भेटीला आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. लव्ह नेचर डार्क बेरीज निस्तेज त्वचेला टवटवी मिळवून देते. त्वचेला ओलावा मिळावा, ती चमकदार आणि आरोग्यपूर्ण दिसावी यादृष्टीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. घरगुती, चवदार पाककृतींपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या उत्पादनांची मालिका तुमच्या त्वचेचे आणि या पृथ्वीचेही हित जपणारी आहे.