इतर

सचिन वाझेची मैत्रीण मीना जॉर्ज ‘एनआयए’च्या ताब्यात

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होते. एनआयएचे पथक १ एप्रिलला (गुरुवारी) संध्याकाळी सहा वाजता दाखल झाले होते. बारा तासांहून अधिक काळ तपास सुरु असल्याने एनआयए पथकाला काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन वाझेचे काळे पैसे पांढरे करण्याचं काम मीना जॉर्ज करत होती. दोन आयडींवरुन हे काम ती करत होती. नोटा मोजायची मशीन देखील याच महिलेजवळ होती. तसंच, ट्रायडेंट हॉटेलच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये जी महिला दिसली ती हीच होती, अशी माहिती आता समोर येत आहे. मीरारोडमध्ये राहणाऱ्या पियुष गर्ग यांच्या सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स सी विंग ४०१ या रुममध्ये ती राहत होती. १५ दिवसांपासून ही महिला गायब होती. या महिलेचा तपास NIA गेले काही दिवस करत होते. अखेर ही महिला NIA च्या ताब्यात सापडली आहे. सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स सी विंग मधील फ्लॅट नंबर ४०१ मागील १५ दिवसांपासून बंद होता. पियुष गर्ग यांचा हा फ्लॅट जाफर शेख या इस्टेट एजंटच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी मीना जॉर्ज यांना तो भाड्याने दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button