अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

जग्वार लँड रोव्हरच्या फ्युचर एअर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजीमुळे विषाणू, जीवाणूचा नायनाट

मुंबई : जग्वार लँड रोव्हरच्या भविष्यातील केबिन एअर प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाने प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये जवळपास ९७ टक्क्यांपर्यंत अंतर्गत विषाणू आणि हवेतील जीवाणू काढून टाकण्यात सक्षमता दाखवली आहे. प्रोटोटाइप हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी) यंत्रणेत पॅनासोनिकच्या नॅनो™ X** तंत्रज्ञानाचा वापर घातक विषाणू आणि जीवाणू काढून टाकण्यासाठी केला आहे आणि त्याचा उपयोग भविष्यातील जग्वार आणि लँड रोव्हर मॉडेल्सना एक खास ग्राहक अनुभव देता येण्यासाठी केला जाईल. हे संशोधन जग्वार लँड रोव्हर आपले भविष्यातील धोरण ठरवत असतानाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. एक शाश्वततेने समृद्ध आधुनिक आलीशानतेची पुनर्कल्पना, एक खास ग्राहक अनुभव आणि सकारात्मक सामाजिक प्रभाव.

जग्वार लँड रोव्हरने परफेक्टस बायोमेड लिमिटेड या आघाडीच्या मायक्रोबायोलॉजी आणि व्हायरोलॉजी प्रयोगशाळेसोबत जागतिक दर्जाचे प्रयोगशाळेवर आधारित सील्ड चेंबर टेस्ट करण्यासाठी भागीदारी केली आहे, जेणेकरून ३० मिनिटांच्या चक्रादरम्यान वाहनाच्या वायुविजन यंत्रणेला पुन्हा फिरण्याच्या मोडवर आणले जाईल. स्वतंत्र संशोधनातून असे दिसले आहे की, यातून काढून टाकलेले विषाणू आणि जीवाणू जवळपास ९७ टक्के होते.

पॅनासोनिकच्या नावीन्यपूर्ण नॅनो™ X तंत्रज्ञानाची तपासणी टेक्सेल या विषाणू तपासणी आणि इम्युनो प्रोफायलींमधील आघाडीच्या आणि जगातील नोव्हल कोरोना विषाणूची तपासणी करण्याची परवानगी असलेल्या प्रयोगशाळांपैकी ए जागतिक संशोधन संस्थेने नोव्हल कोरोना विषाणू (सार्स-कोव-२) विरोधातही केली आहे. दोन तासांच्या प्रयोगशाळेतील चाचणीदरम्यान ९९.९९५ टक्के विषाणू काढून टाकण्यात आल्याचे त्यातून स्पष्ट झाले.***

डॉ. स्टीव्ह इली, जग्वार लँड रोव्हरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, ”आमच्या ग्राहकांचे आरोग्य हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे- आणि आता आधीपेक्षाही जास्त आम्ही आमच्या प्रियजनांची काळजी घेऊ शकेल अशा तंत्रज्ञानीय उपाययोजनांच्या शोधात आहोत. आमच्या तज्ञ अभियंत्यांनी विकसित केलेले आणि सुरू केलेले स्वतंत्र संशोधन हे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी घातक परावजीवी कमी होतील आणि केबिनमधील प्रवाशांसाठी अधिक स्वच्छ वातावरण मिळेल आणि मालकीच्या अनुभवात नवनवीन दर्जा स्थापन केला जाईल यांच्यासाठी केले आहे.”

नॅनो ™ X तंत्रज्ञानावर कार्यरत वायू शुद्धीकरण देण्यासाठी त्यांच्या आधीच्या नॅनो™ पेक्षा ते दहापट जास्त प्रभावी आहे. त्यात ट्रिलियन हायड्रोक्सिल (ओएच) रॅडिकल्सची निर्मिती त्यांच्या नॅनो आकाराच्या पाण्याच्या अणूंमध्ये करण्यासाठी उच्च व्होल्टेजचा वापर करते****. हे ओएच रॅडिकल्स विषाणू आणि जीवाणूंची प्रथिने कमी करतात आणि त्यांची वाढ कमी होण्यास मदत करतात. ओएच रॅडिकल्स एकाच प्रकारे डिओडराइज करून आतील विषाणू अशा प्रकारे कमी करतात, जेणेकरून ग्राहकांसाठी अधिक स्वच्छ वातावरण तयार केले जाऊ शकेल.

जग्वार लँड रोव्हरचे संशोधन अभियंता एलेक्झांडर ओवेन म्हणाले की, ”हे तंत्रज्ञान निसर्गाच्या ताकदीचा पुरेपूर वापर करण्याच्या क्षमतेचे एक उत्तम उदाहरण आहे आणि त्यामुळे जग्वार लँड रोव्हर या केबिन तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आले आहे. हायड्रॉक्सिल रॅडिकल्स हे रसायनशास्त्रातील सर्वांत महत्त्वाच्या नैसर्गिक ऑक्सिडंट्सपैकी एक आहेत आणि ते सहस्त्रकातील पिढीला प्रदूषके आणि इतर घातक घटक दूर करून पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी मदत करत आहेत. या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि आमचे अद्ययावत संशोधन ही भविष्याच्या वाहनांच्या केबिनमध्ये वैज्ञानिक घटक देण्यासाठी पहिले पाऊल ठरतील.”

या पायाभूत संशोधनामुळे जग्वार लँड रोव्हरला भविष्यात पुढील पिढीचे अ‍ॅडव्हान्स केबिन एअर फिल्टरेशन देता येईल. जग्वार रेंजमधील मॉडेल्स आणि नवीन इलेक्ट्रिक जग्वार आय-पेस रेंज रोव्हर इव्होकमध्ये सध्या नॅनो™ तंत्रज्ञन तसेच पीएम२.५ फिल्टरेशनचा वापर केला जातो. एक नावीन्यपूर्ण प्री कंडिशनिंग फीचरही यात उपलब्ध आहे, जेणेकरून ग्राहकांना वाहनात बसण्यापूर्वी ही यंत्रणा सुरू करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button