अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सच्या रांजणगाव केंद्रामधून ३ लाखावी नेक्‍सॉन सादर

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज पुण्‍यातील त्‍यांच्‍या रांजणगाव केंद्रामधून भारताची पहिली जीएनसीएपी ५-स्‍टार रेटेड कार – ३,००,०००वी नेक्‍सॉन उत्पादित केली. जून २०२१ मध्‍ये २,००,०००वी नेक्‍सॉन लाँच केल्‍यानंतर टाटा मोटर्सने ८ महिन्‍यांपेक्षा कमी काळामध्‍ये आणखी १,००,००० नेक्‍सॉन सादर करण्‍याच्‍या विक्रमाची नोंद केली. नुकतेच भारतातील अव्‍वल ५ सर्वोच्‍च सेलिंग कार्समध्‍ये स्‍थान मिळवण्‍यासोबत नेक्‍सॉनने तिच्‍या विश्‍वसनीयतेसाठी अनेक पुरस्‍कार मिळवले आहेत, ज्‍यामुळे ती विभागातील पहिल्‍या क्रमांकाची विक्री होणारी कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही बनली आहे. तसेच ब्रॅण्‍ड नेक्‍सॉनने अंतर्गत कम्‍बशनमध्‍ये आपली क्षमता सिद्ध करण्‍यासोबत आव्‍हाने दूर करत भारतातील ईव्‍ही क्रांतीचे नेतृत्‍व केले आहे. ५० दशलक्ष किमीहून अधिक अंतर ड्राइव्‍ह केलेल्या व प्रमाणित नेक्‍सॉन ईव्‍हीने जवळपास ९८६० टन कार्बनडायऑक्‍साईड उत्‍सर्जनाची बचत केली आहे, जे १.४७ लाख वृक्षारोपण करण्‍याइतके आहे. १३,५०० हून अधिक आनंदी ग्राहक असलेली नेक्सॉन ईव्‍ही सध्‍या ६२ टक्‍क्‍यांहून अधिक (वायटीडी) बाजारपेठ हिस्‍सासह भारतीय ईव्‍ही चार-चाकी विभागावर प्रभुत्‍व गाजवत आहे.

हे संपादन साजरे करण्‍यासाठी आणि न्‍यू फॉरेव्‍हर ब्रॅण्‍ड तत्त्व कायम ठेवण्‍यासाठी टाटा मोटर्सने आज या यशस्‍वी कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीच्‍या टॉप ट्रिम्‍समधील ४ नवीन व्‍हेरिएण्‍ट्स लाँच केले – रोयाल ब्‍ल्‍यूमधील नवीन रंगासह पेट्रोल व डिझेलमध्‍ये एक्‍सझेड+ (पी) / एक्‍सझेडए+ (पी) आणि एक्‍सझेड+ (एचएस) / एक्‍सझेडए+ (एचएस). हे व्‍हेरिएण्‍ट्स #Dark अवतारामध्‍ये देखील ऑफर करण्‍यात येतील. आजपासून बुकिंग्‍जना सुरूवात होण्‍यासह नवीन व्‍हेरिएण्‍ट्स सर्व टाटा मोटर्स ऑथोराईज्‍ड डि‍लरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध असतील.

या संपादनाबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍समधील उल्‍लेखनीय उत्‍पादन असलेली ३,००,०००वी टाटा नेक्‍सॉन सादर होण्‍याचा क्षण आमच्‍यासाठी अभिमानास्‍पद आहे. न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीचा अंतरिम भाग असल्‍यामुळे ब्रॅण्‍ड नेक्‍सॉनने २०१७ मध्‍ये लाँच केल्‍यापासून कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये आपली लोकप्रियता यशस्‍वीरित्‍या सिद्ध केली आहे आणि अनेक कुटुंबांचा भाग बनली आहे. आयसीई व्‍हेरिएण्‍टच्‍या लोकप्रियतेमध्‍ये अधिक भर करत नेक्‍सॉन ईव्‍हीने देखील स्‍वत:साठी बेंचमार्क निर्माण केला आहे आणि ग्राहकांकडून बरेच कौतुक मिळवले आहे. प्रबळ व सुरक्षित एसयूव्‍ही ब्रॅण्‍ड निर्माण करण्‍याची गाथा भारतातील पहिली ग्‍लोबल एनसीएपी ५ स्‍टार रेटेड कार नेक्‍सॉनसह सुरूवात झाली. सुरक्षिततेमध्‍ये बेंचमार्क्‍स निर्माण करत टाटा नेक्‍सॉनचे आकर्षक डिझाइन, उच्‍च दर्जाची राइड व हाताळणी वैशिष्‍ट्ये, उत्‍साहित कार्यक्षमता व आरामदायीपणासाठी व्‍यापक कौतुक केले जात आहे.”

ते पुढे म्‍हणाले, ”नेक्‍सॉनचे यश एसयूव्‍ही विभागामधील आमचे नेतृत्‍व सिद्ध करण्‍यासाठी महत्त्वाचे राहिले आहे आणि या महत्त्वपूर्ण क्षणाला अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी आम्‍ही ग्राहकांकरिता श्रेणीमध्‍ये नवीन व्‍हेरिएण्‍ट्सची भर करत आमचा नेक्‍सॉन पोर्टफोलिओ विस्‍तारित केला आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, नेक्‍सॉन आमचा ग्राहकवर्ग वाढवण्‍यामध्‍ये आणि भविष्‍यात टाटा मोटर्सच्‍या विकासाला चालना देण्‍यामध्‍ये मदत करत राहिल.”

नवीन नेक्‍सॉन एक्‍सझेड+ (पी) / एक्‍सझेडए+ (पी) व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अतिरिक्‍त प्रिमिअम वैशिष्‍ट्ये असतील, जसे प्रिमिअम बेनेके कालिको लेदरेट वेण्टिलेटेड फ्रण्‍ट सीट्स, एअर प्‍युरिफायर आणि ऑटो डिमिंग आयआरव्‍हीएम. तसेच नवीन एक्‍सझेड+ (एचएस) / एक्‍सझेडए+ (एचएस) व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये एअर प्‍युरिफायर असेल, ज्‍यामधून प्रवाशांना आरोग्‍यदायी प्रवासाची खात्री मिळेल. ही अतिरिक्त वैशिष्‍ट्ये त्‍यांच्‍या संबंधित #Dark एडिशन्‍समध्‍ये देखील उपलब्‍ध असतील.

२०१७ मध्‍ये नेक्‍सॉन सादर केल्‍यापासून टाटा मोटर्सने सुरक्षितता, डिझाइन, नियमन, उत्‍सर्जन, महत्त्वाकांक्षा व विभागाला परिभाषित करणा-या वैशिष्‍ट्यांसंदर्भात नेक्‍सॉनमध्‍ये सातत्‍याने अद्ययावत सुधारणा केल्‍या आहेत. यामुळे नेक्‍सॉनला समकालीन आणि ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांनुरुप राहण्‍यास मदत झाली आहे. नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या काझीरंगा एडिशनच्‍या सादरीकरणासह नेक्‍सॉन आता ४० व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल, ज्‍यामधून ग्राहकांना त्‍यांच्‍या गरजांनुसार निवडण्‍यासाठी विविध किंमतीमध्‍ये विविध पर्याय उपलब्‍ध होत आहे. या श्रेणीमध्‍ये ऑटोमॅटिक व मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन पर्याय असलेले पेट्रोलमधील २२ व्‍हेरिएण्‍ट्स आणि डिझेलमधील १८ व्‍हेरिएण्‍ट्सचा समावेश असेल.

नेक्‍सॉन टाटा मोटर्सच्‍या रस्‍ता सुरक्षिततेप्रती कटिबद्धतेची ध्‍वजवाहक राहिली आहे. नेक्‍सॉनने टाटा मोटर्सच्‍या पंच, अल्‍ट्रोज, टियागो व टिगोर अशा इतर कार्सना त्‍यांच्‍या संबंधित विभागांमध्‍ये कार सेफ्टीमधील नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍याचा मार्ग दाखवला आहे. ही कार टाटा मोटर्स पोर्टफोलिओच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणीमधील सर्वात यशस्‍वी उत्‍पादनांपैकी एक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button