टाटा मोटर्सकडून नवीन सफारीसह इंडस्ट्रीतील पहिल्याच सिरॅमिक कोटिंग इन-हाऊस सर्विसचा शुभारंभ

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटो ब्रॅण्डने आज नवीन सफारीसह इंडस्ट्रीतील पहिली सर्विस ऑफरिंग ‘सिरॅमिक कोटिंग’ सुरू केल्याची घोषणा केली. टाटा कार्सच्या लुकमध्ये नवीन सुधारणा करण्यासाठी हे प्रगत हायड्रोफोलिक फॉर्म्युलेशन तंत्रज्ञान आहे. यूव्हींसाठी २८,५०० रूपयांमध्ये (जीएसटीसह) उपलब्ध असलेली ही सर्विस सर्व टाटा मोटर्स अधिकृत डिलरशिप्समध्ये उपलब्ध असेल.
ऐरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये, तसेच हायपर-कार उत्पादकांद्वारे वापरण्यात आलेले सिरॅमिक कोटिंग भक्कम फिनिशिंग देते, ज्यामध्ये वाहनाच्या लुकला नवीन आकर्षकता देण्यासाठी पेंटवर्कचे संयोजन आहे. विद्यमान पारंपारिक ट्रीटमेण्ट्सच्या तुलनेत हे कोटिंग दीर्घकाळापर्यंत टिकते आणि डेब्रिस व ग्रिमच्या संरक्षणामध्ये मदत करण्यासोबत वाहनाचे वाहतूकीमुळे होणारे प्रदूषण, आम्लवर्षा, विद्रावक घटक, प्राणी यांच्यापासून देखील संरक्षण करते. कोटिंगचा प्रबळ क्रिस्टल-सारखा लेप यूव्ही किरणांमुळे वाहनावरील रंग निघून जाण्याचे प्रमाण कमी करतो. सेल्फ-क्लीनिंग वैशिष्ट्यामुळे देखरेख करणे सुलभ होण्यासोबत ऑक्सिडेशन व गंजण्याला प्रतिबंध होतो. ज्यामुळे कारमधील काच, पेंट, एनएमएस/व्हील्स, विंल-प्लास्टिक आणि लेदर अशा साहित्यांचे सर्वांगीण संरक्षण होते. तसेच ‘न्यू फॉरेव्हर’ वचनाशी बांधील राहत टाटा मोटर्स इतर सर्व टाटा पॅसेंजर वाहनांसाठी देखील त्यांच्या संबंधित विभागांनुसार विविध किंमतींमध्ये ही अनोखी सर्विस देणार आहे.
या सर्विसबाबत बोलताना टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वेईकल बिझनेस युनिटचे कस्टमर केअर – डॉमेस्टिक अॅण्ड इंटरनॅशनल बिझनेसचे प्रमुख श्री. डिम्पल मेहता म्हणाले, ”नवीन उत्पादने सादर करण्याव्यतिरिक्त आम्ही सिरॅमिक कोटिंग सारख्या इंडस्ट्रीतील पहिल्या सर्विस ऑफरिंग्ज सादर करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. नवीन कार्स आणि ग्राहकांच्या सर्वसमावेशक मागण्यांची पूर्तता करणा-या यूव्हींच्या लाँचसह ग्राहक आता या आधुनिक उत्पादनांना सुसज्ज करणा-या दर्जात्मक विक्री-पश्चात्त सेवा मिळण्याची देखील अपेक्षा करत आहेत. हीच बाब लक्षात घेत आम्ही भारतामध्ये इन-हाऊस ही उद्योगक्षेत्रातील पहिलीच सर्विस सादर करण्यासाठी ३एम, व्युर्थ, बर्धल व सिकंड स्टॅण्ली बीजी व एसके कार केअर अशा कार केअर तंत्रज्ञानांमधील जागतिक दर्जाच्या कंपन्यांसोबत सहयोग केला आहे. आम्हाला विश्वास आहे की, या मूल्यवर्धित सेवेसह इतर सेवा वाहनाला अधिक प्रमाणात संरक्षण देतील. आम्ही आमच्या ग्राहकांना दर्जात्मक विक्री-पश्चात्त सेवा देण्याचे कार्य सुरूच ठेवू.”
प्रबळ निर्माण दर्जामधून उत्पादनाबाबत प्रबळ आत्मविश्वास निर्माण होतो. यावर भर देण्यासाठी टाटा मोटर्स नवीन सफारीसाठी अतिरिक्त मूल्यवर्धित सेवा देत आहे, ज्यामुळे संपूर्ण उत्पादन ऑफरिंग अधिक आकर्षक बनली आहे.
पेंटाकेअर एक्स्टेण्डेड वॉरण्टी: सफारीसाठी आम्ही जवळपास ५ वर्षे आणि अनलिमिटेड किलोमीटर्स पेंटाकेअर एक्सटेण्डेड वॉरण्टी सादर केली आहे. एक्स्टेण्डेड वॉरण्टीमध्ये ३ पर्याय असतील – २+१ वर्षे/ १.१५ लाख किमी (जे पहिले लागू असेल), २+२ वर्षे/ १.३० लाख किमी (जे पहिले लागू असेल) आणि २+३ वर्षे (पेंटाकेअर)/अनलिमिटेड किमी वॉरण्टी. वॉरण्टी पॅकेजमध्ये इंजिन व इंजिन मॅनेजमेण्ट सिस्टम, एअर कंडिशनिंग सिस्टम, ट्रान्समिशन सिस्टम व गिअरबॉक्स, फ्यूएल सिस्टम अशा सर्व महत्त्वपूर्ण पार्टसच्या महत्त्वपूर्ण मेन्टेनन्स सेवांचा समावेश आहे. तसेच ब्रेकडाऊनशी संबंधित क्लच व सस्पेंशन खराब होणे यासंदर्भातील सर्विस देखील ५०,००० किमी अंतरापर्यंत एक्स्टेण्डेड वॉरण्टीमध्ये समाविष्ट आहे.
व्हॅल्यू केअर मेन्टेनन्स प्लान – अॅन्युअल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट (एएमसी): टाटा मोटर्सने भारतभरातील मेन्टेनन्स सर्विस प्लान – व्हॅल्यू केअर देखील सादर केला आहे, जो अनपेक्षित दुरूस्ती खर्चाविरोधात संरक्षणाची हमी देतो आणि वाहनाच्या कार्यसंचालनादरम्यान ल्युब्रिकण्ट्सची किंमत वाढणे आणि किंमतीमधील बदलासंदर्भात संरक्षण देत स्थिर बचतींची खात्री देतो. ग्राहक व्हॅल्यू केअर गोल्ड, व्हॅल्यू केअर प्रॉमिस टू प्रोटेक्ट आणि व्हॅल्यू केअर सिल्व्हर या तीन प्लान्समधून एका प्लानची निवड करू शकतात. या तीन प्लान्सदरम्यान ग्राहक निर्धारित व शिफारस केलेल्या कालावधीकरिता वाहनाच्या पार्टससाठी अनपेक्षित वेअर अॅण्ड टिअर दुरूस्ती, ऑइल रिप्लेसमेण्ट्स, कन्झ्युमेबल्स, सर्विस पार्टस् आणि वाहनांची नियमित सर्विसिंग अशा विविध सेवांचा लाभ घेऊ शकतात.