‘ब्ल्यूसेमी’कडून इजा-रहित ग्राहक आरोग्यसेवा उत्पादन आयवा (EYVA) चे अनावरण
मुंबई : ‘ब्ल्यूसेमी’ या उभरत्या भारतीय आरोग्यसेवा कंपनीने स्वतःचे क्रांतिकारी असे उत्पादन आयवा (EYVA) हे लास वेगास येथे झालेल्या ‘सीईएस २०२२’मध्ये दाखल केले. आयवा हे शरीराला कोणतीही इजा न करता (नॉन-इंव्हेजीव्ह) ग्राहकसेवा देणारे आरोग्यतंत्र उपकरण असून त्याला पेटंट असलेल्या नाविन्यपूर्ण अशा तंत्रज्ञानाची साथ आहे. त्यात सेन्सर फ्युजन असून अगदी अचूक असा आर्टीफीशीयल इंटेलीजन्स अल्गोऱ्हीदम व स्मार्ट एलओटी आहे. या अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडीच्या सोबतीने आणखी एक बाब म्हणजे आयवाबरोबरच ‘ब्ल्यूसेमी’ ही ‘सीईएस’ या जगातील सर्वाधिक प्रभावी अशा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदर्शनामध्ये आपले उत्पादन प्रदर्शित करणारी पहिली भारतीय आरोग्यसेवा कंपनी ठरली आहे.
सर्वसमावेशक असे हे आरोग्य तंत्र उपकरण असून ते शरीरातील महत्त्वाची अशी सहा परिमाणे मोजते. त्यांत रक्तातील साखरेचे प्रमाण, इसीजी, हृदयठोके, रक्तदाब, एसपीओटू आणि शरीराचे तापमान यांचा समावेश आहे. केवळ स्पर्श करून आणि टोचणी करून रक्त घेण्याचे टाळत हे उपकरण विनामूल्य अशा मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध असून त्यातून दररोजची चाचणी करता येते. त्याद्वारे ग्राहकांना फिटनेस, पोषक आहार आणि तणाव व्यवस्थापन यांच्या अनुषंगाने अधिक चांगली आरोग्य व जीवनशैली यासंबंधीचे निर्णय घेता येतील. त्याशिवाय ग्राहकांना अनेक सशुल्क योजना घेत त्या माध्यमातून अत्याधुनिक परीक्षणे व सूचना मिळवत त्याद्वारे आपल्या जेवणामध्ये व व्यायामामध्ये योग्य ते बदल घडवून आणता येतील.
‘ब्ल्यूसेमी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मड्डीकाटला म्हणाले, आयवा हे आमच्या अथक प्रयत्नांना मिळालेले एक फळ असून हे जग अधिक चांगले आणि आरोग्यपूर्ण बनावे यादृष्टीने असलेली आमची बांधिलकी व कठोर परिश्रम याचा तो परिणाम आहे. हे अत्यंत अतुलनीय असे उत्पादन आम्हाला जगातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक प्रदर्शनामध्ये सादर करण्याची आणि तसे करणारी पहिली भारतीय कंपनी होण्याची संधी मिळते आहे याचा आम्हाला अभिमान आहे. कोणत्याची उत्पादनासाठी यशस्वी होण्यासाठी ते ग्राहकस्नेही असणे गरजेचे असते आणि आयवाने ती चाचणी पार केली आहे. हे उत्पादन अनोखे, भावणारे, साचेबद्ध, छोटे, हाताळायला सोयीचे आणि वापरण्यास कटकटरहित आहे. सर्वच पातळ्यांवर हे उत्पादन क्रांतिकारी ठरणार असून केवळ स्पर्श करून अनेक चाचण्या करता येत असल्याने लोकांच्या आरोग्यसेवा सवयी मोठ्या प्रमाणावर बदलायला ते मदतगार ठरणार आहे.
आजही जगाच्या कित्येक भागांमध्ये कोविड साथरोग आपले अस्तित्त्व राखून आहे. अशावेळी घर, कार्यालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विमानतळ, रेल्वे स्थानके, बाजारपेठा इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी आयवासारखे एखादे उत्पादन उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच हे उत्पादन निर्माण करणे ही आमच्यासाठी वैज्ञानिक गरज तर होतीच पण त्याचबरोबर सतत नाविन्याचा ध्यास घेवून प्रयोग करण्याच्या आमच्या ध्यासाचाही तो एक भाग होता. ‘ब्ल्यूसेमी’ आरोग्यसेवा क्षेत्रातील या नव्या विश्वात सर्वांचे स्वागत करत असून त्यांनी आयवाच्या माध्यमातून ही जादू अनुभवावी, असा त्यांना आग्रह आहे. आयवा उत्पादन मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध होणार आहे, असेही सुनील म्हणाले.