तंत्रज्ञानराजकारण

उपराष्ट्रपतींचे ट्विटर अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड; केंद्र सरकारची नाराजी

नवी दिल्ली : सोशल मीडिया ट्विटरने आपली चूक स्वीकार करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड केलं आहे. भारत सरकारकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने आपला निर्णय काही वेळेतच बदलला. सरकारकडून ट्विटरला स्पष्टपणे कळवण्यात आलं आहे की, उपराष्ट्रपती पद हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाचा भाग नसते. त्यामुळे ट्विटरच्या उपराष्ट्रपतींच्या अकाऊटचे अनव्हेरिफाईड करणे म्हणजे घटनेचा अनादर आहे.

भारत सरकारच्या या कठोर नाराजीनंतर ट्विटरने आपली चूक कबूल केली आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा व्हेरिफाई़ड केलं. ट्विटरने उपराष्ट्रपतींचे अकाऊंट अनव्हेरिफाईड केल्यानंतर त्यावर अनेकांनी टीका केली होती. भाजप नेते सुरेश नाखुआ म्हणाले की, ट्विटरने उपराष्ट्रपतींचे अकाऊंट अनव्हेरिफाईड का केलं? हा भारतीय संविधानाबद्दल अनादर आहे. काही लोकांनी असा दावा केला होता की, उपराष्ट्रपतींचे अकाऊंट बऱ्याच दिवसांपासून निष्क्रिय होतं. त्यामुळे ते अनव्हेरिफाईड करण्यात आलं होतं. त्याआधी ट्विटरने आरएसएसच्या अनेक नेत्यांचे, कुष्ण कुमार, अरुण कुमार तसेच भैय्याजी जोशी यांचे अकाऊंट अनव्हेरिफाईड केलं होतं. त्यावरही आक्षेप घेण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button