नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तसेच देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्ये दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार घातला आहे. तसेच २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे परंतु केंद्र सरकारकडून जबाबदारी शून्य असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा आहे. आतापर्यंत २ लाखापेक्षा अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून जबाबदारी नाही. सरकारने देशाला आत्मनिर्भर केले असा खोचक टोला राहुल गांधी यांनी ट्विट करत लगावला आहे.