अर्थ-उद्योग

टाटा मोटर्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा वाहन ग्राहकांना एकत्रित वित्तीय पर्याय

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनीने देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (एसबीआय) तीन वर्षांचा सामंजस्य ठराव (एमओयू) केला आहे. टाटा मोटर्सच्या छोट्या व कमी वजनाच्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीमध्ये वित्तीय सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने हा एमओयू करण्यात आला आहे. रोजगाराला बढावा देण्यासोबतच या सहयोगामुळे टाटा मोटर्सच्या बीएस6 श्रेणीतील वाहनांसाठी मागणी वाढवण्यातही या ठरावाची मदत होणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून दोन्ही व्यावसायिक संस्था, कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत एकसमानता व पारदर्शकता राखण्यासाठी तसेच टर्न अराउंड टाइम कमी करण्यासाठी, एसबीआयच्या काँटॅक्टलेस लेंडिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष श्री. गिरीश वाघ यावेळी म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी फायदेशीर मूल्यविधान देण्याची आमची प्रामाणिक वचनबद्धता आणखी विस्तारत, देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतभरात व्याप्ती व २२,००० हून अधिक शाखा असलेल्या एसबीआयचे देशभरात विस्तृत जाळे आहे आणि या भागीदारीच्या माध्यमातून आमची व्याप्ती, विशेषत: ग्रामीण भागातील व्याप्ती, दृढ करण्यात मदत होईल, अशी आशा आम्हाला वाटते. यामुळे रोजगारनिर्मितीत हातभार लागेल तसेच आमच्या ग्राहकांना अनोख्या व नवोन्मेषकारी पद्धतीने वित्तीय सहाय्य पुरवणेही शक्य होईल. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सामाईक बलस्थानांचा उपयोग करून घेऊ शकू आणि आमच्या ग्राहकांना समर्पितपणे व उत्साहात सेवा देऊ शकू असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो”

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सी. एस. सेट्टी या भागीदारीबद्दल म्हणाले, “या परस्परांना लाभ देणाऱ्या सहयोगाचा उपयोग करून घेण्यास आणि देशभरातील व्यावसायिक वाहन ग्राहकांना व डीलर्सना काही अनोख्या वित्तीय सेवा देऊ करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्या नवोन्मेषकारी काँटॅक्टलेस लेण्डिंग प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांचा बँकिंग अनुभव मोठ्या प्रमाणात वाढवू शकू आणि रिटेलर्सना सर्व अंगांनी लाभ देऊ शकू अशी आशा आम्हाला वाटते.”

टाटा मोटर्सचा छोट्या व कमी वजनाच्या व्यावसायिक वाहनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ एकंदर सीव्ही परिसंस्थेत खूपच यशस्वी ठरला आहे. एसबीआयबरोबर झालेल्या या सहयोगामुळे टाटा मोटर्सच्या सीव्ही ग्राहकांना फारसे अडथळे न येता कर्ज उपलब्ध होतील तसेच एसबीआयच्या अनोख्या तंत्रज्ञानप्रेरित उत्पादनांचाही लाभ घेता येईल. या सहयोगाद्वारे सुलभ कर्जरचना असलेल्या योजना आणल्या जातील. यामुळे बीएस4 व बीएस6 वाहनांच्या किमतीतील फरक भरून काढणे, डाउन पेमेंट तसेच वाहनाचा ईएमआय हे सर्व हाताळणे सोपे होईल.

टाटा मोटर्स सीव्हींच्या बीएस6 श्रेणीचे इंजिनीअरिंग ‘पॉवर ऑफ सिक्स’ तत्त्वज्ञानाच्या आधारे करण्यात आले आहे. आराम व सोय, नफा कमावण्याची क्षमता, सुरक्षा व सुरक्षितता या सर्व निकषांवर सर्वोत्तम अशा सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच ग्राहकांना त्यांच्या पैशाचा पुरेपूर मोबदला देणारी ही वाहने आहेत. या दमदार व खात्रीशीर वाहनांना संपूर्ण सेवा 2.0, टाटा समर्थ आदी मूल्यवर्धित सेवांची जोड देण्यात आली आहे. टाटा मोटर्स या मूल्यवर्धित योजनांच्या माध्यमातून व्यावसायिक वाहनचालकांचे कल्याण, अपटाइम गॅरंटी, कस्टमाइझ्ड वार्षिक देखभाल व ताफा व्यवस्थापन सोल्युशन्स आदी सेवा पुरवते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button