यंदाच्या उन्हाळ्यात गोएअरकडून प्रवाशांसाठी भरपूर सुविधा
गोएअर फ्लायस्मार्ट – अधिक सामान घ्या, कमी पैसे भरा आणि कितीही वेळा तारखा बदला अगदी मोफत

मुंबई : गोएअर या भारतातील सर्वात विश्वासार्स एअरलाइन ब्रँडने देशांतर्गत प्रवाशासांठीच्या विविध वैशिष्ट्यांसह आज त्यांच्या समर सेलची घोषणा केली आहे. येत्या उन्हाळ्यात ग्राहकांना नेमके काय हवे याचा सखोल अभ्यास करून या वैशिष्ट्यांची खास रचना करण्यात आली आहे. यातील पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अतिरिक्त मुल्याशिवाय 5 किलो अतिरिक्त सामान नेता येणार आहे. कमाल बॅगेजच्या संदर्भात ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्यासाठी यंदाच्या मोसमात अतिरिक्त बॅगेज हा अत्यंत सुयोग्य पर्याय असेल.
ग्राहकांना त्यांच्या तिकिटांच्या तारखेत कितीही वेळा बदल करता येतील आणि तेही विनामूल्य. या सुविधेमुळे माझ्या बहुमोल ग्राहकांना त्यांना उन्हाळी प्रवास योजना योग्य तऱ्हेने मांडता येतील आणि त्यातून मन:शांतीही लाभेल. गोएअर वेबसाइट वेबसाइट, अॅप आणि एअरपोर्ट तिकिट काऊंटर्स अशा सर्व थेट माध्यमातून तिकिटे बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी गोएअरने कन्व्हिनिअन्स फीसुद्धा माफ केली आहे.
गोएअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौशिक खोना म्हणाले, सगळीकडे समर सेल लागतात. पण, यंदाच्या उन्हाळ्यात गोएअर ग्राहकांना शब्दश: #FlySmart करता येणार आहे. वक्तशीरपणा, परवडणारे दर आणि सोय अशी गोएअरची तीन मूळ तत्वे मी इथे अधोरेखित करतो. अतिरिक्त सामान, मोफत तारखा बदलणे आणि कन्व्हिनिअन्स फी माफ करणे या सोयींमुळे आल्हाददायक आणि आनंदी अनुभव मिळेल.