अर्थ-उद्योग

सायरस पूनावालाही कुटुंबासमवेत लंडनला रवाना; पिता-पुत्राने देश सोडल्याने चर्चेला उधाण

लंडन : जागतिक लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला हे गेल्या महिन्यात लंडनला निघून गेले आहेत. यानंतर आता वडील सायरस पूनावालाही लंडनला रवाना झाले आहेत. सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिटयूट समुहाचे अध्यक्ष आहेत. आता वडिलांनीही आपल्या कुटुंबासमवेत लंडन गाठल्यामुळे पूनावाला परिवाराने देश का सोडला याचा तर्कवितर्क लावला जात आहे. पण सायरस पूनावाला यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, युरोपमध्ये लस निर्मिती कंपनी उभारण्याच्या विचारात आहे.

याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राशी सायरस पूनावाला म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला येतो. त्यामुळे आता जी लोकं असं म्हणत आहेत की, मी आणि माझ्या मुलानं देश सोडला आहे. ते सर्व खोटं आणि मूर्खपणाचं आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी दरवर्षी मे महिन्यात लंडनला येत असतो. लहानपणापासून आदरही इथे येत असतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मी आणि माझ्या कुटुंबीयांनी येथे येणं काही नवीन नाही.

पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ही कंपनी सध्या कोरोना विषाणूवरील कोविशिल्ड नावाची लस उत्पादीत करत आहे. देशातील एकूण ९० टक्के लस याच कंपनीत बनवली जात आहे. त्यामुळे देशाच लसीकरण करण्याची मोठी जबाबदारी आदर पूनावाला यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाब वाढत असल्याचही त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे आदर पूनावाला यांना फोन करून दबाब टाकणारे ते शक्तशाली लोकं नेमकी कोण? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात गूढ बनून राहिला आहे.

आदर पूनावाला गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये वास्तव्याला असून ते युरोपमध्ये लस निर्मितीचे नवीन युनिट सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. याची पुष्टी पुन्हा एकदा सायरस पूनावाला यांनी केली आहे. यावेळी सायरस म्हणाले की, सध्या पुण्यात लस तयार केली जात आहे. परंतु आम्ही युरोपमध्ये एक नवीन युनिट स्थापित करण्याच्या विचार करत आहोत. पण आत्ताच, याबद्दल कोणतीही माहिती देणं उतावीळ ठरू शकतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button