मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे ईडी, सीबीआयचं, आयकर विभागाचं शुक्लकाष्ट सुरुच आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निकवर्तीयांवर आज आयकर विभागानं छापेमारी केलीय. या मंत्र्यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या ४ बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. आज दिवसभर जवळपास ४० ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत.
बांधकाम व्यावसायिक असलेल्या जयंत शाह, प्रशांत निलावार, गिरीश पवार आणि किर्ती कावेडीया यांच्यावर ईडीने छापे टाकले आहेत. गिरीश पवार यांच्या बायकोला ४ तासांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर गिरीश पवार आणि त्यांच्या पत्नीला आयटी ऑफिसला घेऊन जाण्यात आलं आहे. नरिमन पॉईंटमधील अंबेसी सेंटरमध्ये गिरीश पवार यांचं घर आणि कार्यालय आहे.