राजकारण

उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ फुलणार, काँग्रेसचा सफाया; जनमत चाचण्यांचे अंदाज

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येणार असा अंदाज बहुतांश जनमत चाचण्यांतून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या सध्या असलेल्या ३०२ जागांमध्ये घट होऊन त्या पक्षाला २४० ते २६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचा गड राखला जाणे हेच भाजपसाठी मोठे यश ठरणार आहे. त्या राज्यात भाजपला जोरदार टक्कर देणाऱ्या समाजवादी पक्षाला किमान १५० जागा मिळतील, असा अंदाज आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर येण्याचा होरा जनमत चाचण्यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत. या निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्यातले मतदान सोमवारी पूर्ण झाले. त्यानंतर जाहीर झालेल्या जनमत चाचण्यांतील निष्कर्षांनुसार भाजप उत्तर प्रदेशमधील सत्ता कायम राखणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून, विविध जनमत चाचण्यांमध्ये भाजपला पुढीलप्रमाणे जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गोव्यात त्रिशंकू स्थिती

गोव्यामध्ये भाजप व काँग्रेसला कदाचित सारख्या जागा मिळून, तिथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असे म्हटले जात आहे. मणिपूर व उत्तराखंडमध्ये भाजप सत्तेवर येईल, असे पोल ऑफ पोल्सच्या निष्कर्षांतून सूचित होत आहे. पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुतांश जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांप्रमाणे काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गोव्यात गोव्यात भाजपला १८ ते २२ जागा : सावंत

छोट्या पण राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या गोव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. एक्झिट पोलनुसार गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात भाजपचीच सत्ता स्थापन होणार असा विश्वास व्यक्त केलाय. गोव्यात भाजपला १८ ते २२ जागा मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन करु. पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे हे आमच्या डबल इंजिन सरकारं प्राधान्य आहे. एक्झिट पोलनुसार भाजप उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि पंजाबमध्येही चांगली कामगिरी करु, असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय.

पंजाबमध्ये ‘आप’ची चक्क सेन्च्युरी होण्याचा अंदाज

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एक्झिट पोलबाबत केलेलं एक रिट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. एका एक्झिट पोलचा हवाला देत अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये चक्क आम आदमी पार्टीला शंभरच्या आसपास जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार, पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये येईल, असं बोललं जातंय. टुडेज चाणक्यने निवडणुकीबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप समोर येईल, असं सांगण्यात आलं आहे. १०० जागा आपला मिळतील, असं सांगितलं जातंय. त्यातील ११ जागा कमी जास्त होऊ शकतात, असंही सांगण्यात आलंय. या अंदाजांनुसार, संपूर्ण बहुमत आपला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाब विधानसभा निवडुकांमध्ये आपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता एकीकडे वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपला जेमतेम एकच जागा मिळेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अकाली दलाला ६ तर काँग्रेसला १० जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चाणक्यने वर्तवलेला हा एक्झिट पोल अरविंद केजरीवाल यांनी रिट्वीट केला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहे. २०१७ मध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता. तर आप हा दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला होता. २०१७ मध्ये आपला २० जागा जिंकण्यात यश आलं होतं. तर काँग्रेसनं ७७ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, अकाली दलाला १५ तर भाजपला ३ जागा जिंकण्यात यश आलं होतं. दरम्यान, आता १० मार्चला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांत कुणाच्या पारड्यात नेमक्या किती जागा मिळतात, हे स्पष्ट होईल. मात्र त्याआधी समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलची चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button