Top Newsफोकसमनोरंजनसाहित्य-कला

अविनाश पाटील (Tabla player) यांचे लंडन (London) येथे तबला वादन

पुणे, दि. ५ – युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक (Tabla player) अविनाश पाटील (Avinash Patil) यांच्या सोलो तबला वादनाच्या (Solo Tabla play) मैफिली इंग्लंडमधील लंडन, न्यु कॅसल, रेडिंग तसेच आयर्लंड देशातील डब्लिन येथे होणार आहेत. येथील विविध महाराष्ट्र मंडळे (Maharashtra Mandal), सांकृतिक संस्था यांच्यातर्फे दिनांक ६ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान त्यांच्या तबला वादनाच्या मैफिलींचे आयोजन करण्यात आले आहे. पाटील यांनी तबला वादनात संगीत अलंकार पदवी व एम.ए .तबला वादनात पुणे विद्यापीठाचे (Pune University) सुवर्णपदक (Gold Medal) प्राप्त केले आहे.

पाटील यांनी तबल्याची तालीम त्यांचे वडील कलापिनी संगीत विद्यालयाचे संचालक व प्रसिद्ध तबला वादक गुरु पं. प्रमोद पाटील व दिल्ली घराण्याचे ख्यातनाम तबला वादक पं. उमेश मोघे यांचेकडे घेतली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर प्रचंड संघर्ष व कष्ट करुन त्यांनी स्व-कर्तुत्वावर आपली वेगळी ओळख संगीत विश्वात निर्माण केली आहे. पद्मभूषण पं. राजन- साजन मिश्रा (Pt. Rajan-Sajan Mishra) यांच्यासारख्या जागतिक ख्यातीच्या अनेक कलाकारांना त्यांनी साथसंगत केली आहे, तसेच सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह (Sawai Gandharva Sangeet Mahotsav) देशात व परदेशातील रसिकांची त्यांनी दाद मिळवली आहे . ग्रामीण भागात जन्मलेल्या पाटील यांनी अपार मेहनतीने संगीत क्षेत्रात यश संपादन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button