महिला

‘ब्ल्यू डार्ट’च्या खारघर कार्यालयात संपूर्ण महिलाराज

मुंबई : ब्ल्यू डार्ट या दक्षिण आशियातील प्रीमिअर एक्स्प्रेस हवाई आणि एकात्मिक दळणवळण आणि वितरण कंपनीने सर्व उद्योग विभागांमध्ये आघाडीचे स्थान प्रस्थापित केले आहे. त्यांचे मनुष्यबळ, तंत्रज्ञान तसेच हवाई आणि जमिनीवरील एक्स्प्रेस नेटवर्क ज्यामुळे ग्राहकांना प्रीमिअम अनुभव मिळतो अशा सर्व बाबींमुळे हे बाजारपेठेतील नेतृत्व स्थान मिळाले आहे. या आघाडीच्या एक्स्प्रेस लॉजिस्टिक प्रदाता कंपनीचे हे नेतृत्वस्थान यंदाच्या महिला दिनी अधिक बळकट होणार आहे. बहुविधता आणि सर्वसमावेशकतेतही आघाडी घेत ही कंपनी आपले पहिले ब्ल्यू डार्ट ऑल वुमन सर्विस सेंटर सुरू करत आहे.

अनेक वर्षांपासून लॉजिस्टिक उद्योग एका ठराविक साच्यात, पुरुषांचे वर्चस्व असल्याप्रमाणे चालत आहे. मात्र, या उद्योगातील हा दृष्टिकोन बदलण्यासाठी ब्ल्यू डार्ट आपल्या स्थापनेपासून म्हणजे अगदी 1983 पासून लक्षणीय प्रयत्न करत आहे. कंपनीने आपल्या ब्ल्यू डार्टर्सना प्रचंड प्रमाणात संधी देऊन पुढे जाण्यात आणि या उद्योगात आपली ओळख निर्माण करण्यात साह्य केले आहे. क्षमता असलेल्या महिलांना कंपनीने वरिष्ठ नेतृत्वाच्या जागा घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ब्ल्यू डार्ट म्हणजे लॉजिस्टिक उद्योगात लिंगसमावेशकता जपणारी कंपनी कशी असते याचे उत्तम उदाहरण आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे असलेल्या सर्व महिला सर्व्हिस सेंटरमध्ये सोळा उत्साही महिलांची टीम आहे. या महिला व्यवस्थापक, कस्टमर सर्विस रीप्रेझेंटेटिव्ह, सेक्युरिटी पर्सनल तसेच सेल्स आणि काऊंटर स्टाफ अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. ही दमदार टीम ग्राहकांना ब्ल्यू डार्टची ओळख असलेली अतुलनीय दर्जेदार सेवा देतील. याचबरोबर ही कंपनी बहुविधता आणि सर्वसमावेशकतेचा हा उपक्रम आणखी पुढे नेत आहे. ‘एम्प्लॉयर ऑफ चॉईस’ या उपक्रमातून अधिकाधिक महिलांना ब्ल्यू डार्ट कुटुंबात समाविष्ट केले जाणार आहे आणि लवकरच खारघरच्या ऑल महिला सर्विस सेंटरप्रमाणेच अंधेरी येथे आणखी एक केंद्र सुरू केले जाणार आहे. अंधेरी सर्विस सेंटरमध्ये एकूण मनुष्यबळापैकी 70 टक्के महिला असतील आणि आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत या महिला लिंगबहुविधतेचे उदाहरण मांडतील.

सर्व महिला सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन करताना ब्ल्यू डार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफोर मॅन्युअल म्हणाले, “आमच्या व्यवसायात महत्त्वाच्या असलेल्या ‘माणसे प्रथम तत्वज्ञाना’नुसार आमचे सर्व कर्मचारी-लिंग, वय, जात, धर्म असा कोणताही भेदभाव न बाळगता- हेच आमच्या संस्थेत प्राधान्यक्रमावर आहेत. ब्ल्यू डार्ट नेहमीच समान संधी देणारी कंपनी राहिली आहे. महिला कर्मचाऱ्यांना त्यांची कामे स्वतंत्रपणे करण्यास आम्ही नेहमीच पाठबळ आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्या सहभागामुळे ब्ल्यू डार्ट भारतात गोल्ड स्टँडर्ड ऑफ एक्स्प्रेस लॉजिस्टिक हा दर्जा मिळवू शकली. आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक संधीतून आपला पुढील मार्ग शोधणे आणि आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आपले काम कमाल क्षमतेने पूर्ण करणाऱ्या खंबीर महिलांना ब्ल्यू डार्टने अधिक विकसित केले. महिला कुरिअर्स ते आमच्या वरिष्ठ नेतृत्व टीममधील ब्ल्यू डार्ट एव्हिएशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर तुलसी मिरचंदानी आणि आमच्या नॅशनल कस्टमर सर्विस हेड सोनिया नायर, महिलांनी ब्ल्यू डार्टला वर्षानुवर्षे नवे मापदंड स्थापित करण्यास, ते गाठण्यात साह्य केले आहे, त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या अनेकांसाठी, अगदी माझ्यासाठीही प्रेरणास्थान आहेत.”

ते पुढे म्हणाले, “बहुविधता महत्त्वाची आहे. विशेषत: तुमचा व्यवसार व्यापक ग्राहकापर्यंत पोहोचला असेल तेव्हा. प्रत्येक ग्राहकाची भौगोलिक जडणघडण नीट समजून घेणारे आणि त्याचे प्रतिबिंब असणारे असे मनुष्यबळ तुम्हाला हवे असते. ग्राहकांच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करण्यात यशस्वी होण्यात या मुद्दयाचे आम्हाला साह्य झाले. ब्ल्यू डार्टने आजवर मांडलेल्या मापदंडांमध्ये सर्वसमावेशकता उपक्रमाची आणखी एक भर पडलेली पाहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

‘कनेक्टिंग पीपल, इम्प्रुव्हिंग लाईव्ह्स’ या आपल्या उद्दिष्टासह ब्ल्यू डार्टने तीन मुख्य मुद्द्यांवर भर दिला आहे – गोग्रीन (पर्यावरणरक्षण), गोटिच (शिक्षणावर भर) आणि गोहेल्प (आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद). बहुविधता वाढवण्यावर अधिक भर देत असतानाच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच ब्ल्यू डार्टने महिला कुरिअर्ससाठी इलेक्ट्रिक व्हिइकल्स आणल्या. त्यांच्या सेवेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, याची खातरजमा यातून केली गेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button