४८ टक्के विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध; धक्कादायक सर्व्हे

मुंबई : जागतिक महिला दिवस आता तोंडावर आहे आणि महिलांचं जग वेगानं बदलत असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी घरात चूल आणि मूल सांभाळणारी महिला आता नोकरी व्यवसायासाठी पुरुषांइतकीच घराबाहेर आहे आणि त्याच अनुषंगानं तिचे नातेसंबंधही वेगानं बदलत आहे. एका नव्या सर्वेनुसार विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचं उघड झालं आहे.
ग्लिडेन ह्या पोर्टलनं भारतीय महिलांचा सर्वे केला. त्यांच्या निरिक्षणानुसार विवाहबाह्य संबंधात असलेल्या 48 टक्के महिला ह्या मॉम म्हणजेच आई आहेत. अशा संबंधात असलेल्या 78 टक्के महिला ह्या उच्च शिक्षित तर आहेतच पण 74 टक्के महिला ह्या नोकरी व्यवसायात उच्चपदस्थही आहेत. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा वेगानं बदलताना दिसत आहेत.
इतर कोणती निरिक्षणं आहेत सर्वेची? ग्लिडेननं वय वर्ष 30 ते 60 दरम्यान असलेल्या महिलांचा सर्वे केला आहे. ग्लिडेन हे महिलांनीच एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर्ससाठी डिझाईन केलेलं पोर्टल असून त्याचा युजरबेस हा 10 लाख आहे. त्यामुळेच सर्वेतली निरिक्षणं महत्वाची आहेत. विवाहबाह्य संबंधाचं मुख्य कारण हे वैवाहिक जीवनात असलेलं बोअरडम आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम असल्यामुळे आयुष्यातला डलनेस किंवा बोअरडम घालवण्यासाठी असे निर्णय घेतल्याचं सर्वेतून पुढं आलं आहे. यात 76 टक्के महिला अशाही आहेत ज्या स्वत:ला पार्टनरपेक्षा जास्त शारीरिकदृष्ट्या स्मार्ट समजतात.
64 टक्के अशा आहेत, ज्या सेक्सच्या दृष्टीनं समाधानी नाहीत. 60 टक्के अशा आहेत, ज्यांच्या जीवनात लग्न असूनही नवऱ्यासोबत कुठलेही लैंगिक संबंध नाहीत. हेही लक्षात असू द्या विवाहबाह्य संबंधामुळे आधी अपराधी भावना यायची पण आता तीही गायब होत असल्याचं विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलांचं म्हणनं आहे. जमाना बदलतोय आणि त्यात आता हुक अपस, पेड सेक्स, सायबर सेक्स, अशा गोष्टींची अपराधी भावन होतच नसल्याचं दिसून येतं आहे.
2019 साली काय निरिक्षणं होती सर्वेची? ग्लिडेननेच दोन वर्षापुर्वीही असाच सर्वे केलेला होता आणि त्यात 77 टक्के महिला ह्या विवाहबाह्य संबंधात असल्याचं निरिक्षण नोंदवलेलं होतं. विशेष म्हणजे सेम सेक्स संबंधात 45 टक्के वाढ झाल्याचेही उघड झाले होते. सुप्रीम कोर्टानं असे संबंध गुन्हा नसल्याचं जाहीर केल्यानंतर यात वाढ झाली होती. वैवाहिक जीवनातलं तोच तोचपणा हे एकमेव कारण विवाहबाह्य संबंधांसाठी असल्याचं निरिक्षण नोंदवलं गेलं होतं.