Top Newsराजकारण

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स

मुंबई : कोरेगाव-भीमा युद्धाच्या २०० व्या स्मृतिदिनी १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावला आहे. सिंग आणि शुक्ला यांना ११ नोव्हेंबर रोजी साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. भीमा कोरेगाव दंगल झाली तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या, तर परमबीर सिंग हे राज्य पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे २०० वर्षपूर्तीनिमित्त विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाज कंटकांकडून भीमा कोरेगाव येथे मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाने आता परमबीर सिंग आणि रश्मी शुकला यांना समन्स बजावलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button