स्पोर्ट्स

टेक्‍नोतर्फे ब्रॅण्‍ड-कनेक्‍ट उपक्रम ‘टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रन’सह वर्ष २०२१ ची उत्‍साहात सुरुवात

नवी दिल्‍ली : टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज टेक्‍नो इंडिया रनच्‍या (TECNO India Run) पहिल्‍या व्‍हर्च्‍युअल पर्वाच्‍या लाँचची घोषणा केली. ब्रॅण्‍ड–कनेक्‍ट उपक्रम तरूण टीजीला सामावून घेतो आणि भारत सरकारच्‍या ‘फिट इंडिया मूव्‍हमेण्‍ट’ला देखील दृढ करतो. ही व्‍हर्च्‍युअल रन १३ व १४ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्‍यात येणार आहे, तसेच सहभागी त्‍यांच्‍या आवडीच्‍या ठिकणांपासून सुरक्षितपणे व सक्रियपणे सहभाग घेतील. ‘टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रन’च्‍या माध्‍यमातून ब्रॅण्‍डचा लोकांना त्‍यांच्‍या वर्तणूकीमध्‍ये बदल घडवून आणण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा आणि आरोग्‍य व फिटनेसला त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवण्‍याचा मनसुबा आहे.

आमच्‍या टेक्‍नो सीएमआर स्‍टडीमधून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारावर या मोहिमेची संकल्‍पना मांडण्‍यात आली. टेक्‍नो सीएमआर स्‍टडीने निदर्शनास आणले की, अस्‍पायरेशनल भारतमधील सातपैकी जवळपास तीन युजर्सनी लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान नवीन कृती व छंद जोपासण्‍यास सुरूवात केली आहे. अहवालाने अधिक निदर्शनास आणून दिले की, लॉकडाऊनदरम्‍यान आरोग्‍य व फिटनेससंदर्भातील कृतींसाठी स्‍मार्टफोन वापरामध्‍ये ५४ टक्‍क्‍यांची वाढ झाली. महामारीमुळे ग्राहकांनी आरोग्‍य, फिटनेस व स्‍वास्‍थ्‍याकडे लक्ष देण्‍यास सुरूवात केल्‍याचे दिसण्‍यात आले आहे. हा नवीन उपक्रम टेक्‍नोच्‍या त्‍यांच्‍या ग्राहकांसाठी संबंधित, जबाबदारपूर्ण व सर्वसमावेशक उपक्रम सादर करण्‍याच्‍या विश्‍वासाला अधिक दृढ करतो. टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रन आघाडीची क्रीडा उद्योजक यूटूकॅनरनसोबत सहयोगाने आयोजित करण्‍यात आली आहे आणि या रनला भारतभरातील १०० रेस अॅम्‍बॅसडर्सचे नेतृत्‍व मिळेल. या अॅम्‍बॅसडर्समध्‍ये २०१८ मध्‍ये नऊवारी साडी परिधान करून प्रख्‍यात बर्लिन मॅरेथॉनमध्‍ये रनिंगसाठी गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड होल्‍डर क्रांती साळवी हिचा देखील समावेश आहे. तिला इतर विविध वर्ल्‍ड मेजर रनिंग पुरस्‍कार देखील मिळाले आहेत, जसे २०१७ मध्‍ये बोस्‍टन मॅरेथॉन, २०१८ मध्‍ये एनवायसी मॅरेथॉन, २०१९ मध्‍ये कॉमरेड्स आणि २०१९ मध्‍ये शिकागो मॅरेथॉन. तसेच हाफ मॅरेथॉन्‍स धावलेली एकमेव भारतीय मूत्रपिंड प्रत्‍यारोपण सर्व्‍हायवर शिबानी गुलाटी, बेंगळुरूमधील बेअरफूट अॅण्‍ड मिनिमल रनर, अॅडवेन्‍चर ट्रॅव्‍हलर व टीईडीएक्‍स स्‍पीकर आकाश नाम्बियार अशा निपुण रनर्सचा देखील समावेश आहे.

टेक्‍नोच्‍या या फिटनेस उपक्रमाबाबत ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, ”टेक्‍नोने नेहमीच ग्राहकांना सर्वात अर्थपूर्ण अनुभव देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रनचा ग्राहकांना त्‍यांच्‍यासाठी महत्त्वपूर्ण असलेले आरोग्‍य, फिटनेस व स्‍वास्‍थ्‍याकडे लक्ष केंद्रित करण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा मनसुबा आहे. गेल्‍या वर्षी लोकांनी बहुतांश वेळ घरीच व्‍यतित केला. हालचाल नाही, प्रवास नाही आणि घरातूनच काम व ऑनलाइन शिक्षणामुळे जीवनशैली बैठेकाम करण्‍याची झाली. या महामारीमुळे लोक त्‍यांच्‍या आरोग्‍याकडे बारकाईने लक्ष देत आहेत आणि विविध दैनंदिन कार्यांचा सामना करताना फिटनेसला प्राधान्‍य दिले जात आहे. लोकांनी व्‍हर्च्‍युअल वर्क-आऊट्समुळे त्‍यांचे आरोग्‍य सुदृढ करण्‍यास सुरूवात केली आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, भविष्‍यात डिजिटल व फिजिकलचे संयोजन पाहायला मिळेल.”

यूटूकॅनरनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संस्‍थापक श्री. पी. वेंकटरमन म्‍हणाले, ”आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य विशेषत: महामारीनंतरच्‍या विश्‍वामध्‍ये आपल्‍या जीवनामधील महत्त्वपूर्ण घटक बनले आहेत. यापूर्वी लोक त्‍यांचे वर्कआऊट्स किंवा आरोग्‍य नित्‍यक्रमाकडे फारसे लक्ष देत नव्‍हते. या व्‍हर्च्‍युअल रन मोहिमेसाठी टेक्‍नोसोबतचा हा सहयोग देशभरातील नागरिकांना आरोग्‍यदायी जीवनशैलीसाठी या कार्यक्रमामध्‍ये सहभाग घेण्‍यास प्रोत्‍साहित करेल.”

टेक्‍नो इंडिया व्‍हर्च्‍युअल रनमध्‍ये तीन विभाग असतील – २ किमी परफॉर्मन्‍स वॉक, ५ किमी स्‍पीड रन आणि १० किमी पॉवर रन. ८००० हून अधिक सहभागी या रनमध्‍ये सहभाग घेण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे हा अलिकडील काळामधील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. सहभागींना एक जर्सी, नेकवेअर आणि ई-सर्टिफिकेट मिळेल.

सहभाग घेण्‍याची प्रक्रिया:

ही रन फिटनेसप्रेमी, अमेचर रनर्स, प्रोफेशनल रनर्स व नवशिक्‍यांसह सर्वांसाठी खुली आहे, जे रनमध्‍ये सहभाग घेऊन शकतात. सहभागींनी १० मार्च २०२१ पर्यंत ऑनलाइन <https://tecnoindiarun.com/> येथे किंवा निवडक रिटेल आऊटलेट्समध्‍ये नोंदणी करावी.

नोंदणी केल्‍यानंतर सहभागींना कन्‍फर्मेशन मेलसह टेक्‍नो अॅपसाठी एक लिंक मिळेल. सहभागींचे रनिंग स्‍टॅट्स ‘स्‍ट्रावा’ अॅपच्‍या माध्‍यमातून नोंदवण्‍यात येतील. हे अॅप त्‍यांच्‍या कृतीची माहिती टेक्‍नो अॅपला कळवेल, जेथे विजेत्‍यांना पुढील प्रक्रियांबाबत माहिती देण्‍यात येईल. सहभागींनी एकाच प्रयत्‍नामध्‍ये त्‍यांची निवडलेली रेस पूर्ण करणे अपेक्षित आहे. विविध प्रयत्‍न केलेल्‍या प्रवेशिका अपात्र ठरतील.

विभागानुसार विजेत्‍यांना मिळणारी बक्षीसे:

फास्‍टेट टाइम (टॉप ३): २ किमी वॉक – ३,४९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर
फास्‍टेट टाइम (टॉप ३): ५ किमी रन – टेक्‍नो पोवा स्‍मार्टफोन
फास्‍टेट टाइम (टॉप ३): १० किमी रन – १ टेक्‍नो पोवा + ३,४९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर
सोशल मीडियावरील टॉप १० क्रिएटिव्‍ह प्रवेशिका – ३,४९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर
अर्ली बर्डस्: रेस लवकर सुरू करणारे पहिले ७ रनर्स – १,२९९ रूपये किंमतीचा १ वायरलेस स्‍पीकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button