Top Newsराजकारण

शिवसेना मजबूत करा; उद्धव ठाकरेंचे सर्व जिल्हाप्रमुखांना आदेश

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना शिवसंपर्क मोहीम राबवण्याचे आणि संघटना मजबूत करण्याचे आदेश दिले असल्याची शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकाच्या समस्या जाणून घ्या, त्यांना योग्य उपचार, कोरोना लस मिळतेय का याचा आढावा घ्या, शिवसेनेचे विचार लोकांपर्यंत पोहचवा असे आदेश शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले असल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे. शिवसेना येत्या १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत राज्यभरात शिवसंपर्क मोहीम राबविणार असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले आहे.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम सुरु करण्यात आली होती. ती जाहीर केल्यानंतर काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट फार तीव्रतेने महाराष्ट्राप्रमाणे संपुर्ण देशामध्ये आली यामुळे तो कार्यक्रम आणि मोहिम स्थगित केली. आता कोरोनाची लाट काही प्रमाणात नियंत्रणात आहे परंतु धोका कमी झाला नाही. याचे भान ठेवून कुठेही गर्दी न होता व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम करायचा आहे. यामध्ये शिवसेनेचे प्राथमिक सदस्य नोंदणी, नवीन मतदार नोंदणी, संरचना, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, गटप्रमुख अशी यंत्रणा कशी काम करत आहे.

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणूका येत आहे. त्या पार्श्वभूमीवर १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान हे शिवसंपर्क महीम अभियान राबवण्यात येणार आहे. याचा अहवाल शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. त्याच्यासोबतच माझे गाव, कोरोनामुक्त गाव हे अभियान शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते त्या अभियानाच्या माध्यमातून गावा गावांमध्ये पोहचण्याचा कार्यक्रम करणार आहे.

शिवसेनेचे विचार गावागावत पोहचवा आणि शिवसेना राज्यभरात मजबूत करा असे आदेश पक्षप्रमुखांना दिले आहेत. आघाडी आणि युतीबाबत चिंता करु नका, प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी पक्ष उभा आहे. माझ गाव कोरोनामुक्त गाव मोहीम राबवा, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी सर्व सेना जिल्हा प्रमुखांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button