राजकारण

नितेश राणे-वरुण सरदेसाई वाद चिघळणार!, भाजप कार्यालयात मोकाट कुत्री सोडण्याचा प्रयत्न

...तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढणार : नितेश राणे

मुंबई/नाशिक : शिवसेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान, सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. मात्र, आगामी काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. सचिन वाझे बेटिंगवाल्यांकडून पैसे उकळतात. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती?, असे सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचे फोनवरील संभाषण आहे. याप्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपास करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती.

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.

आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी मंगळवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केले. तपास यंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. आता वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांनी मागितल्यास मी देईन, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय: सरदेसाई
राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button