राजकारण

अनिल देशमुखांकडून सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट

परमबीर सिंगांचा 'लेटर बॉम्ब'

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी केल्याचा दावा एका इंग्रजी संकेतस्थळाने केला आहे. परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून गच्छंती झाल्यानंतर ब्लेम गेम सुरू होतानाच त्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केला आहे.

याआधीच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी परमबीर सिंग (Prambir Singh) यांच्या कार्यपद्धतीकडे बोट उचलत त्यांची चूक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात परमबीर सिंग यांची बदली का केली असा सवाल करण्यात आला होता. त्यामुळे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) पलटवार करत एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘टाईम्स नाऊ’ या संकेतस्थळाने एका ट्विटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांचा खळबळजनक दावा प्रसिद्ध केला आहे. परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी गृहमंत्र्यांवर हे आरोप केले आहेत. सचिन वाझेंना बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे वसूल करण्याचे आदेश देशमुख यांनीच दिले होते असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

प्रत्येक महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे आदेश खुद्द गृहमंत्र्यांनीच दिले होते या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ने अटक केली आहे. सचिन वाझेंनी वापरलेल्या गाड्या, मुंबई पोलिस दलात पदाचा केलेला दुरूपयोग आणि पोलीस दलाची मलिन केलेली प्रतिमा यासारख्या गोष्टीमुळे परमबीर सिंग यांना जबाबदार ठरवत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंग (Prambir Singh) यांची गच्छंती केली. त्यांच्या जागेवर मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नेमणुक करण्यात आली आहे. पण परमबीर सिंग (Prambir Singh) यांच्या दाव्यामुळे पोलीस दलासह राज्याच्या राजकारणातही मोठा भूकंप झाला आहे. याचा फटका हा महाविकास आघाडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनाही बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

काय म्हणाले परमबीर सिंग?

परमबीर सिंग पत्रात म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

नाराजीतून बॉम्बगोळा

वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंग यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली होती. डीजी रँकमध्ये हे शेवटच्या दर्जाचं पद असल्याने एक प्रकारची शिक्षा केल्या सारखीच राज्य सरकारने परमबीर सिंग यांना वागणूक दिली होती. त्यामुळे सिंह नाराज होते. अपराध केल्यासारखी ही वागणूक असल्यामुळे परमबीर सिंग यांनी देशमुख-वाझे नेक्ससचा पर्दाफाश केला असावा असं बोललं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button