अर्थ-उद्योग
मार्च महिन्यात जीएसटीची विक्रमी वसुली

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रकोप (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) खराब स्थितीत पोहोचली अर्थव्यवस्था (Indian Economy) आता रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यातील जीएसटी कलेक्शनने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे.
देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी मिळाला असल्याचं ट्वीट अर्थमंत्रालयाने केलं आहे. या एकूण जीएसटीत केंद्रीचा जीएसटी 22,973 कोटी, राज्याचा जीएसटी 29,329 कोटी आणि एकीकृत जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर उपकर 8 हजार 757 कोटी इतका आहे. यात 935 कोटी रुपये वस्तु आयातीवर मिळालेल्या कराचे आहेत.