आरोग्य

भारतात ‘ना नफा’ तत्वावर लस पुरवण्याची ‘फायझर’ची तयारी

नवी दिल्ली : भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी ‘फायझर’ने ‘ना नफा’ तत्वावर अर्थात कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात भारत सरकारशी चर्चा सुरू असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अमेरिकन कंपनी फायझरने स्पष्ट केले आहे की सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी कंपनीचे काही वेगळी धोरणे असून त्याच्या आधारे ना-नफा किंमतीमध्ये काही देशांना कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत. विकसित, विकसनशील आणि मागासलेल्या देशांसाठी फायझरच्या कोरोना लसींच्या किंमती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील कोरोना लसीकरणामध्ये कंपनीचा हातभार लागेल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीच्या एका डोसची किंमत ही १९.५ डॉलर इतकी आहे. तर युरोपमध्ये कंपनीने आपल्या लसीच्या किंमतीत वाढ केली आहे. सुरुवातीला १२ युरोमध्ये उपलब्ध होणारी ही लसीची किंमत नंतर १५.५ इतकी करण्यात आली आणि त्यात आता पुन्हा वाढ करून २०२२-२३ सालच्या आगाऊ मागणीसाठी ती १९.५ युरो इतकी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button