तंत्रज्ञान

मुंबई डीओटीच्या एलएसएतर्फे ईएमएफ रेडिएशनविषयी ऑनलाईन कार्यशाळा

मुंबई : डीओटीच्या मुंबई एलएसए तर्फे आज टेलिकॉम सेवा प्रदाता (टीएसपीज), पायाभूत सुविधा प्रदाता (आयपीज), सीओएआय, टावर ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशन (टीएआयपीए) आणि स्थानीय अधिकारी यांच्यासाठी एका ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. जनतेला सातत्याने माहिती देण्याच्या उपक्रमा अंतर्गत डीओटी कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, या द्वारे मोबाईल टावरच्या विकीरणामुळे होणार्‍या धोक्यांबद्दल समाजातील गैरसमज कमी करण्यासाठी माहिती देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत हे श्रीमती शिवकामी राजगोपालन् , डीडीजी (प्रशासन) यांनी केले आणि या वेळी रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशन्स (आरडब्ल्यूएज) तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थां बरोबर सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि जनतेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना डीओटी चे सिनियर डेप्यूटी डायरेक्टर जनरल श्री नझिमुल हक यांनी नमूद केले “ मोबाईल रेडिएशनस विषयी असलेले गैरसमज लोकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता आणणे आवश्यक आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये मोबाईल रेडिएशन्स विषयी चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.”
ईएमएफ रेडिएशन वरील आपल्या सादरीकरणाचा एक भाग सादर करतांना श्री हेमंत बोरले , डायरेक्टर (कॉम्प्लायन्स) यांनी नमूद केले की “ साधारणपणे ज्या भागात मोबाईल टावर्स असतात त्या भागातील लोकांचा त्याला विरोध असतो पण दुसरीकडे ते सातत्याने चांगल्या कव्हरेजचीही मागणी करत असतात. म्हणूनच आता हे महत्त्वपूर्ण आहे की लोकांमधील ही भिती घालवून त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात यावे.”
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) चे न्युरोसर्जन डॉ. विवेक टंडन यांनी मोबाईल टावर्स च्या रेडिएशन विषयी आपले विचार मांडले आणि त्यांनी या विषयी असलेल्या गैरसमजांबद्दल आपले मौल्यवान विचार व्यक्त केले. त्यांनी हे ही स्पष्ट केले की सेल टावर्स मधील कमी शक्तीच्या नॉन आयोडायझिंग रेडिएशन मुळे कोणत्याही मानव/प्राण्यांवर घातक परिणाम झाल्याचा वैद्यकीय/शास्त्रीय पुरावा नाही.
मोबाईल टावरच्या ईएमएफ रेडिएशन्स च्या परिणामां विषयी नागरिकांनी चिंता करू नये कारण त्यांचे विकीरण हे सातत्याने तपासले जाते आणि विश्वसनीय स्त्रोतांकडून सातत्याने ही तपासणी होत असल्यामुळे ईएमएफ रेडिएशन्सचा होणारा घातक परिणाम टाळणे शक्य होते. भारत सरकार कडून आयसीएनआयपीआर आणि डब्ल्यूएचओ ने ठरवून दिलेल्या निकषांच्या तुलनेत १० पट कठोर असे निकष लावण्यात आलेले आहेत.
डीओटी कडून सातत्याने मोबाईल टावर्स वरून होणार्‍या रेडिएशनवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येते. मोबाईल बेस ट्रान्सिव्हर स्टेशन (बीटीएस)ची जोडणी करण्यापूर्वी मोबाईल ऑपरेटरला त्यांच्या बीटीएस कडे मुख्य मोबाईल टावर कडून येणारे विकीरण प्रमाणित करावे लागते व ते डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स ने घालून दिलेल्या निकषांनुसार असावे लागतात. म्हणूनच सेल टावर कडून होणारे रेडिएशन हे केवळ नॉन आयोनायझिंगच नव्हे तर त्यांची शक्ती ही खूपच कमी असते. त्याच बरोबर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स चे फिल्ड ऑफिसर्स हे सातत्याने अचानक भेटी देऊन मोबाईल टावर्स चे रेडिएशन तपासून ते डीओटी च्या निकषांनुसार आहेत किंवा नाहीत ते तपासतात.
प्रश्नोत्तराच्या सत्राचे नेतृत्च श्री सी. पी सामंत, डीडीजी (कॉम्प्लायन्स) यांनी केले, यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की भविष्यातील जोडणीसाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून चांगल्या पायाभूत सुविधा असतील तर अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी याची मदत होऊ शकते आणि याचमुळे आपले जीवन आणि काम यांत सुधारणा होऊ शकेल. या चर्चासत्रानंतर मुंबई एलएसए चे संचालक (ॲडमिनिस्ट्रेशन) श्री एम के जैन यांनी आभार प्रदर्शन केले.
सेलफोन टावर मधून हे विकीरण होत असते ते मोबाईल फोनच्या वापराच्या वेळी असलेल्या विकीरणापेक्षा कित्येक पटींनी कमी असते. डीओटी आणि टेलिकॉम सेवा प्रदाता हे जारी करण्यात आलेल्या निकषांचे पालन करण्यास कटिबध्द आहेत. या निकषांची निर्मिती ही नागरीकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली असून ईएमएफ चे हे निकष आपल्या प्रिय नागरिकांच्या रक्षणासाठी आहेत.
त्याच बरोबर सामान्य नागरिक सुध्दा आपल्या जवळच्या टावरवरून किती प्रमाणात विकीरण होत आहे हे तरंग संचार च्या पोर्टल (http://tarangsanchar.gov.in/EMFportal) वरून तपासून पाहू शकतात. जर नागरिकांना कुठल्याही जागेवरील रेडिएशनची लेव्हल तपासायची असेल तर ते कधीही डीओटी अधिकार्‍यांशी संपर्क साधून किंवा या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन शुल्क भरून तपासणी करू शकतात. जर अधिक प्रमाणात रेडिएशन असेल तर लोकांच्या मागणीनुसार किंवा ‍डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स कडून स्वत: हून ही तपासणी केली जाते, हे विकीरण अधिक प्रमाणात असेल तर बीटीएस्स ना २० लाख रूपयांपर्यंतचा कठोर दंड भरावा लागतो. मुंबईच्या लायन्सेन्स सर्व्हिस एरियात आजमितीस डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स कडून २२२७८ बीटीएस ची तपासणी करण्यात आली आहे.
मोबाईल रेडिएशनची तपासणी- मोबाईल नुसार स्पेसिफिक ॲब्सॉर्पशन रेट (एसएआर) ची तुम्हाला तपासणी करण्यासाठी तुम्ही *#07# हा नंबर डायल करू शकता. एसएआर म्हणजे असे मुल्य आहे जे सेलफोन द्वारे फेकणार्‍या किरणांची माहिती देते, व ते मोबाईलच्या हॅन्ड सेटवर दिसून येते. मानवी पेशींच्या १ ग्रॅम वस्तूमानावर १.६ वॅट्स/किलो इतकेच विकीरण मोबाईल कडून करणे आवश्यक असून या निकषात बसणारे मोबाईल्सच भारतात वापरण्यास व भारतात स्थानिक वापरासाठी आयात करण्याची परवानगी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button