Top Newsराजकारण

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज; भातखळकरांच्या वक्तव्याने वाद वाढणार

मुंबई : ईडीचे सहसंचालक राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. आता भाजप नेते, आ. अतुल भातखळकर यांनी नबाव मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तसेच पंतप्रधान कार्यालयामधील सचिव ए.के. शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून नवाब मलिक यांनी ट्विट करत या एजन्सीमध्ये काम करणारे ते भाजपचे कार्यकर्ते होते. अशा पद्धतीने अजून बरीच कामे आहेत. या भाजप कार्यकर्त्यांबद्दल विरोधी पक्ष जे बोलत होते ते आता खरे ठरू लागले आहे. अशी टीका केली होती.

नवाब मलिक यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते अतुल भातखळकरांनी नवाब मलिक यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना ब्रेनमध्ये इंजेक्शन देण्याची गरज आहे, मात्र मेंदूच नसल्यान तिथही फारसा फायदा होत नाही अशी घणाघाती टीका केली आहे. तसेच तुम्ही कुठली इंजेक्शन घेता हे तर साऱ्या जगाला माहिती आहे. नसेल माहिती तर तुमच्या जावयाला विचारा. आधी तुमच्या घरात काय सुरूय ते बघा आणि मग इतर ठिकाणी लक्ष घाला, तुमचे आमदार काय करत आहेत ते आधी बघा आणि मग भाजपवर बोलण्यासाठी तोंड उघडा, अशी टीका केली आहे.

नवाब मलिक सतत ईडीवरून भाजपला टार्गेट करताना दिसून येतात, तर त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून पलटवार होताना दिसून येतात. गेल्या काही दिवासांपासून एनसीबी आणि ईडीवरून नवाब मलिक यांनी सतत भजापवर टीका केली. भाजप नेत्यांनीही वेळोवेळी त्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आता भातखळकरांच्या वक्तव्याने पुन्हा हा वाद वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button