अर्थ-उद्योग

‘एल अँड टी’ची बांधकाम आणि खाणकाम यंत्र उद्योगात ७५ वर्षे पूर्ण

मुंबई : लार्सन अँड टुब्रो, या ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने बांधकाम आणि खाणकाम यंत्र व्यवसाय (सीएमबी) या सर्वात जुन्या उद्योगाची प्लॅटिनम ज्युबिली पूर्ण केली आहे. या व्यवसायाने आपल्या 75 वर्षांच्या कारकीर्दीत बांधकाम आणि खाणकाम उद्योगाशी संबंधित विविध प्रकारच्या उपकरणांची 60,000 युनिट्स पुरवली आहेत. ही यंत्रे असामान्य डिझाइन्सचे मापदंड तयार करण्यासाठी वापरण्यात आली असून त्यांनी राष्ट्राच्या वाढत्या पायाभूत सुविधांना लक्षणीय योगदान दिले आहे.

याप्रसंगी लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्र्हमण्यम म्हणाले, ‘राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाची उपकरणे उपलब्ध करून देण्यात अग्रेसर राहाण्याचा वारसा एल अँड टीला लाभलेला असून कंपनी अभियांत्रिकी रचना आणि उत्पादन क्षमतेच्या देशांतर्गत विकासात कायमच पुढे राहिलेली आहे. आमच्या बांधकाम आणि खाणकाम यंत्र व्यवसायाने गेली 75 वर्ष नाविन्यपूर्ण उपकरणे आणि उल्लेखनीय सेवा पुरवत खाणकाम व बांधकाम उद्योगाच्या गरजा पूर्ण केल्याचा आम्हाला आऩंद वाटतो.’

सीएमबीच्या दिमाखदार प्रवासाविषयी आनंद व्यक्त करत एल अँड टी बांधकाम आणि खाणकाम विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष अरविंद के गर्ग म्हणाले, ‘गेल्या सात दशकांपासून आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना सेवा देण्याची संपूर्ण बांधिलकी जपली आहे. एल अँड टीने विविध जागतिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि पद्धती देशाच्या विकासासाठी प्रथमच उपलब्ध करून दिल्या आहेत. या महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही आमच्या ग्राहकांचे त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी आभारी आहोत.’

एल अँड टीने 1945 पासून मिळालेले सखोल ज्ञान आणि अनुभव याचा पूर्ण वापर केला आहे आणि व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर्स व व्हील लोडर्सचा समावेश असलेली स्वतःची ‘मेक इन इंडिया’ रस्ते मशिनरी बनवली आहे. देशांतर्गत रचना व उत्पादन करण्यात आलेली ही मशिन्स आता रस्ते बांधकाम आणि महामार्ग विकासात मदत करत असून त्यामुळे एल अँड टी ‘आत्मनिर्भर भारत’ हे राष्ट्रीय मिशन पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल करत आहे.

1973 मधे पोक्लेन एसए- फ्रान्स यांच्या सहकार्याने उत्खननासाठी हायड्रॉलिक उपकरण (एक्सकॅव्हेटर) लाँच करत कंपनीने मोठे पाऊल उचलले. हा क्रांतीकारी आणि प्रवर्तकीय उपक्रम होता तसेच माती हलवण्याच्या कामात पूर्णपणे नवी संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी अतिशय गरजेचा झालेला प्रयत्न होता. यामुळे एल अँड टी पायाभूत सुविधा बांधकामातील धोरणात्मक भागीदार ठरली. इतर काही सहकार्यांमधे – अल्बारेट- फ्रान्स, जेआय केस, युएसए, विब्रोमॅक्स, डेट्रॉइट डिझेल- युएसए यांचा समावेश होता.

त्यानंतर 1998 मधे कोमात्सु आणि एल अँड टी या अभियांत्रिकी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी कोमात्सुची अत्याधुनिक यंत्रे तयार करण्यासाठी संयुक्त भागिदारी केली. कोमात्सु पीसी200-6 एक्सकॅव्हेटर ‘दर्जा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणा’ यातील मापदंड आणि आयकॉनिक मॉडेल ठरला. पुढील काही वर्षांत एक्सकॅव्हेटरची पीसी71, पीसी130, पीसी300 आणि पीसी450 अशी काही मॉडेल्स लाँच करत एल अँड टीने आघाडीचे स्थान मिळवले तसेच 25,000 मौल्यवान ग्राहकांचा मोठा व निष्ठावान वर्ग तयार केला.

सातत्याने नाविन्याची कास धरत एल अँड टीने नुकताच कोमात्सु पीसी210- 10एमओ हायड्रॉलिक एक्सकॅव्हेटर लाँच केला असून त्याला मोठे यश मिळाले. या उपकरणाने सर्व विक्रम तोडत 22- टन विभागात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे उपकरण बनण्याचा मान मिळवला आहे. केवळ 10 महिन्यांच्या कालावधीत या उपकरणाने 1000 चा टप्पा ओलांडला आणि आता ते बाजारपेठेत आघाडीचे स्थान मिळवण्याच्या वाटेवर आहे.

भारतात खनिज खाणकामाचा विस्तार झाल्यानंतर कोमात्सु आणि एल अँड टीने खाणकाम सुरक्षित, पर्यावरणस्नेही आणि शाश्वत करण्याचा निर्णय घेतला. तो पूर्ण करण्यासाठी खाणकामाची मोठी यंत्रे उदा. डम्प ट्रकएचडी785, डोझर मॉडेल्स डी155 आणि डी475, एक्सकॅव्हेटर मॉडेल्स पीसी 1250 आणि पीसी2000 लाँच केली. या यंत्रांनी ग्राहकांच्या कामाच्या ठिकाणी कामगिरी, उत्पादनक्षमता, दीर्घायुष्य या बाबतीत नवे मापदंड तयार केले आहेत. एल अँड टीने खाणकामाच्या मोठ्या प्रकल्पांसाठी कोमात्सु मॅमॉथ240 टन क्लास 830ई डम्प ट्रक्स आणि 16 सीयूएम क्लास पीसी3000 हायड्रॉलिक एक्सकॅव्हेटर लाँच केले. त्यातून कंपनीची इतक्या वर्षात विकसित झालेली असामान्य क्षमता परत अधोरेखित झाली.

कोळसा उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोळसा खाणकाम कंपन्यांनी कंत्राटदारांतर्फे अतिरिक्त काम काढण्यास सुरुवात केली. याला मायनिंग टिपर्स या नव्या क्षेत्राची गरज होती आणि कोमात्सु पीसी450 एक्सकॅव्हेटर त्यासाठी अतिशय योग्य ठरले. एल अँड टीने अत्याधुनिक टिपर ट्रक उपलब्ध करण्यासाठी स्कॅनियाशीही भागिदारी केली. हा ट्रक आपली दर्जेदार कामगिरी, किफायतशीरपणा, ऑपरेटरला मिळणारा सहजपणा आणि सुरक्षेमुळे मध्यम- खाणकाम क्षेत्रामधे प्रचंड लोकप्रिय ठरला.

एल अँड टीला ग्राहकसेवेची दीर्घ परंपरा लाभली असून ‘सेवेतून मिळते यश’ या वचनावर कंपनीचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच बांधकाम आणि खाणकाम उद्योगातील मोठ्या लोकसंख्येला पाठिंबा देण्यासाठी एल अँड टीने विक्रीपश्चात आणि सेवा क्षेत्रासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यायला सुरुवात केली. आज कंपनीकडे जागतिक दर्जाची सहा सेवा केंद्रे, कुशल आणि अनुभवी इंजिनियर्सची टीम आणि केंद्रीय प्रशिक्षण केंद्र, बांधकाम उपकरणांसाठी 30 वितरक आणि भारतभरात सुट्या भागांचे डेपो आहेत. यातून यंत्राची कार्यान्वितता आणि उपयुक्तता वाढवण्यात लक्षणीय फरक पडला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button