अर्थ-उद्योग

पेटीएमची आयआरसीटीसीच्या सहयोगाने डिजिटल तिकिटिंग सेवा

मुंबई : भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकी धारण करणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) आज इंडियन रेल्वे कॅटेरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सोबतच्या त्यांच्या सहयोगाला अधिक दृढ केल्‍याची घोषणा केली आहे. याद्वारे ग्राहकांना देशभरातील रेल्वे स्टेशन्सवर स्थापित करण्यात आलेल्या ऑटोमॅटिक तिकिट वेण्डिंग मशिन्स (एटीव्हीएम) च्या माध्यमातून डिजिटल तिकिटिंग सेवा मिळणार आहे.

पेटीएम या नवीन भागीदारीसह भारतातील क्यूआर कोड-आधारित पेमेण्ट्समध्ये अग्रस्थानी आहे. कंपनी त्यांच्या क्यूआर सोल्यूशन्समध्ये वाढ करत आहे. पहिल्यांदाच भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये कॅशलेस प्रवास करण्याला चालना देण्यासाठी एटीव्हीएमवरील यूपीआयच्या माध्यमातून तिकिटिंग सेवांकरिता डिजिटली पेमेण्ट करण्याचा पर्याय देत आहे.

रेल्वे स्टेशन्सवर ठेवण्यात आलेल्या एटीव्हीएम टच-स्क्रीन आधारित तिकिटिंग किओस्क्स आहेत, ज्या प्रवाशांना स्मार्ट कार्डसशिवाय डिजिटली पेमेण्ट करण्याची सुविधा देतील. प्रवाशी स्क्रीन्सवर येणारे क्यूआर कोड्स स्कॅन करत अनारक्षित ट्रेन प्रवास तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतील, त्यांच्या हंगामी तिकिटांचे नूतनीकरण करू शकतील आणि स्मार्ट कार्डस् रिचार्ज करू शकतील. पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बाय नाऊ, पे लॅटर), नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड अशा विविध पेमेण्ट पर्यायांच्या माध्यमातून पेटीएम प्रवाशांना पेमेण्ट्स करण्याची सुविधा देत आहे.

नवीन क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड-आधारित डिजिटल पेमेण्ट सोल्यूशन भारतातील रेल्वे स्टेशन्सवरील सर्व एटीव्हीएम मशिन्सवर कार्यरत आहे.

पेटीएम प्रवक्ता म्‍हणाले, “भारतातील क्यूआर कोड क्रांतीमध्ये अग्रस्थानी असलेल्या आम्हाला रेल्वे स्टेशन्सवर सुलभ तिकिटिंग सेवा देण्यामध्ये पुढाकार घेण्याचा आनंद होत आहे. आयआरसीटीसीसोबतच्या आमच्या सहयोगासह आम्‍ही भारतीय रेल्वेच्या ऑटोमॅटिक तिकिट वेण्डिंग मशिन्समध्ये पेटीएम क्यूआर सोल्यूशन्सची सुविधा देत आहोत. याद्वारे प्रवासी पूर्णत: कॅशलेस प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.”

पेटीएमचे एटीव्हीएमसाठी नवीन डिजिटल पेमेण्ट सोल्यूशन कंपनीने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या अनेक सेवांमधील नवीन भर आहे, ज्यामध्ये त्यांच्या अॅपच्या माध्यमातून ई-कॅटेरिंग पेमेण्ट्स आणि आरक्षित ट्रेन तिकिट बुकिंगचा समावेश आहे. नवीन वैशिष्‍ट्य कंपनीच्या देशभरात कॅशलेस व्यवहार व डिजिटल पेमेण्ट्सना चालना देण्याप्रती असलेल्या प्रयत्नाशी संलग्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button