किंग्स इन्फ्राचा विश्वविक्रम; ८० ग्रॅम वजनाच्या व्हेनामी कोळंबीचे उत्पादन

मुंबई : किंग्स इन्फ्रा व्हेंचर लिमिटेड, या तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत मत्स्यपालन करणाऱ्या कंपनीने ८० ग्रॅम (२१० मिमी) वजनाच्या कोळंबीचे उत्पादन करून तलावामध्ये एल व्हेनामी कोळंबीच्या मत्स्यपालन वाढीचा विश्वविक्रम रचला आहे. सफेद पायांची कोळंबी म्हणून सर्वसामान्यतः ओळखली जाणारी एल व्हेनामी ही मूळची पूर्व प्रशांत महासागरातील असून, मेक्सिकोतील सोनोरा या राज्यापासून ते पार दक्षिणेकडे उत्तर पेरूपर्यंत ही कोळंबी आढळते.
एफएओ आणि इतर संशोधन संस्थांकडील माहितीनुसार, आपल्या नैसर्गिक महासागर अधिवासामध्ये, १२ ते १४ महिन्यांच्या वयात कोळंबीची ही जात जास्तीत जास्त २३० मिमी पर्यंत वाढू शकते आणि याची कमाल कार्पिस लांबी ९ सेमी आहे. तलावांमध्ये केल्या जाणाऱ्या मत्स्यपालन प्रणालीमध्ये १०० ते १३० दिवसांमध्ये अशी वाढ साध्य करणे ही बाब आश्चर्यकारक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. सर्वसाधारण मत्स्यशेतांमध्ये उत्पादन करण्यात येणाऱ्या कोळंबीचे सरासरी वजन १८ ते २० ग्रॅम आहे. कोळंबीची विक्रमी वाढ किंग्स इन्फ्राच्या संशोधन व विकास विभागाने विकसित केलेल्या सिस्टा३६० शिष्टाचारांचे पालन करून सर्वसामान्य मातीच्या तलावांमध्ये करण्यात आली आहे.
किंग्स इन्फ्राचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शाजी बेबी जॉन यांनी सांगितले, आमच्याकडील माहिती असे दर्शवते की, जगभरात कुठेही एखाद्या ऍक्वाफार्ममध्ये प्रत्येकी ८० ग्रॅम वजनाच्या एल व्हेनामी कोळंबीचे उत्पादन करण्याची आल्याची नोंद करण्यात आलेली नाही. सिस्टा३६० प्रोटोकॉल फार्मिंग प्रथा ही आमच्या संशोधन व विकास टीमने विकसित केलेली, आमची मालकीची प्रणाली असून त्यामुळे आम्ही हा विक्रम रचू शकलो आहोत.
या पिकाच्या काळात आमच्या शेतातील कोळंबीचे सरासरी वजन ३० ते ५० ग्रॅमच्या दरम्यान होते, परंतु सर्वात शेवटी जेव्हा कोळंबी काढल्या तेव्हा काही कोळंबी ७५-८० ग्रॅमपर्यंत वाढल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले, असे देखील त्यांनी पुढे सांगितले.
शाजी बेबी जॉन पुढे म्हणाले, या कामगिरीचे श्रेय आमच्या संशोधन आणि विकास टीमने विकसित केलेल्या सिस्टा३६० फार्मिंग प्रोटोकॉलचे आहे. सिस्टा३६० ही बायोफ्लॉक, ऍक्वामिमिक्री आणि मत्स्यपालनाच्या आयएमटीए पद्धतींमधून स्वीकारलेल्या आणि भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यात आलेल्या तत्त्वांचा वापर करून सिम्बायोटिक तंत्रज्ञानावर आधारित तयार करण्यात आलेली एकात्मिक प्रणाली आहे. या शेतीमध्ये फक्त प्रतिजैविक मुक्त खाद्य, प्रोबायोटिक्स आणि नैसर्गिक पूरक आहार वापरला गेला असल्याने या यशाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रोटोकॉलअंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी, वाढीचा दर वाढवण्यासाठी दही, गूळ, हळद, शेवग्याची पाने, लसूण, चिंच आणि इतर घटक नियमितपणे वापरण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.