अर्थ-उद्योग

राज्याच्या बांधकाम विभागाचा विक्रम; २४ तासांत ४० किमी रस्त्याचे काम पूर्ण

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. १४७ वर सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. सलग २४ तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय.

रविवारी, दि. ३० मे २०२१ रोजी सकाळी ७ पासून ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही नोंद घेतली आहे.

कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. हे काम करुन प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विभागाच्या कामगिरीचं कौतुक केले.

विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे. अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button