सिरो क्लिनफार्मची अॅक्रॉस ग्लोबल अलायन्सशी भागीदारी

मुंबई : सिरो क्लिनफार्म या भारतातील क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनने अॅक्रॉस ग्लोबल अलायन्सशी (अॅक्रॉस) भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. तसेच, फार्मास्युटिकल सेवा क्षेत्रातील त्रुटी भरून काढण्यासाठी अॅक्रॉसची सामायिक उद्दिष्ट्ये व लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतात प्रतिनिधित्व करण्याचेही कंपनीने ठरवले आहे. अॅक्रॉस ही क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनची (सीआरओ) जागतिक सहाय्यक असून ती पार्टनर्स म्हणून ओळखली जाते, तसेच विशेष सेवा पुरवठादार क्वालिफाइड व्हेंडर्स म्हणून नावाजले जातात. अॅक्रॉस संस्थेचा पार्टनर्स हा गाभा आहे. सिरो क्लिनफार्मला भारतामध्ये मूलभूत सेवा व कौशल्य देण्याची संधी मिळणार आहे.

सिरो क्लिनफार्मचे संचालक करण दफ्तरी यांनी या भागीदारीविषयी बोलताना म्हटले, “या भागीदारीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे. सिरो क्लिनफार्मला अॅक्रॉसच्या भारतातील ग्राहकांना सहाय्य करण्याची संधी मिळणार आहे, तर अॅक्रॉस व संस्थेच्या पार्टनरना जगभरातील 96 देशांतील क्लिनिकल कौशल्याच्या मार्फत सिरो क्लिनफार्मच्या ग्राहकांना मदत करता येणार आहे. या भागीदारीच्या निमित्ताने, सिरो क्लिनफार्मला अॅक्रॉस पार्टनर्सच्या सहयोगाने जागतिक क्लिनिकल ट्रायल्समध्ये सक्रिय सहभागी होता येईल. यामध्ये भारताचाही समावेश केला जातो.”
अॅक्रॉस पार्टनरशिप मॉडेल हे विमान वाहतूक क्षेत्रातील विविध सहयोगांप्रमाणे असून, अॅक्रॉस ही केंद्रीय समन्वय साधणारी संस्था कमीत कमी खर्चामध्ये सुरळितपणे जागतिक क्लिनिकल ट्रायल व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करते. यामुळे ग्राहकांसाठी किफायतशीर सेवा देणे शक्य होते.
“अॅक्रॉसला भारतामध्ये काम करण्याची उत्सुकता होती. भारतात काम करणाऱ्या सीआरओंचे बारकाईने विश्लेषण केल्यानंतर, सेवांचे पूर्ण मूल्यमापन व सर्व बाबतीत योग्य काळजी घेतल्यानंतर भारतात विस्तार करण्यासाठी सिरो क्लिनफार्म आदर्श असल्याचे ठरवण्यात आले,” असे अॅक्रॉस ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्हन बुक्विक यांनी सांगितले. “सिरो क्लिनफार्मकडे गतीशील व भविष्यात्मक विचार करणाऱ्या प्रोफेशनलची आदर्श टीम आहे आणि ही टीम जागतिक फार्मास्युटिकल सेवा पुरवठादारांप्रती असलेल्या अॅक्रॉसच्या दृष्टिकोनाशी मिळतीजुळती आहे”.
त्यांचे सर्वसमावेशक कौशल्य व विशेष सेवा यामुळे ग्राहकांना निश्चितच फायदा होईल आणि अॅक्रॉसचे भारतातील कार्य अधिक बळकट होईल. विज्ञान व वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या 200 हून अधिक प्रोफेशनलच्या अनुभवी टीमच्या मदतीने सिरो क्लिनफार्म फार्मास्युटिकल, एफएमसीजी व वैद्यकीय उपकरणे उद्योगातील आपले ज्ञान व अनुभव उपलब्ध करून जागतिक अभ्यासांमध्ये सक्रिय सहभागी होऊ शकेल. पार्टनर्स व क्वालिफाइड व्हेंडर्सना समाविष्ट करून घेण्यासाठी अॅक्रॉसने विशिष्ट प्रक्रिया निश्चित केलेली आहे. तसेच, अभ्यास सुरळितपणे केले जावेत, यासाठी उत्तम गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणाही राबवली आहे. अॅक्रॉसचा भागीदार म्हणून, क्लिनिकल ट्रायलसाठी अत्यंत दर्जेदार, अद्ययावत सेवा देण्यासाठी सिरो क्लिनफार्म सज्ज आहे.