अर्थ-उद्योग

टाटा मोटर्स व ब्‍लू स्‍मार्ट मोबिलिटी सहयोगाने दिल्‍ली-एनसीआरमध्‍ये ऑल-इलेक्ट्रिक फ्लीटचे विस्‍तारिकरण

मुंबई : भारताने लसीकरणासंदर्भात मैलाचा दगड संपादित करण्‍यासोबत अधिकाधिक लोक कामाच्‍या ठिकाणी परतत असताना शेअर्ड मोबिलिटी बाजारपेठ देखील झपाट्याने वाढत आहे. सप्‍टेंबर २०२१ मध्‍ये एक्‍सप्रेस-टी ईव्‍हीच्‍या देशव्‍यापी लाँचनंतर टाटा मोटर्स या भारताच्‍या आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज दिल्‍ली एनसीआरमधील त्‍यांचा बहुआयामी ऑल-इलेक्ट्रिक फ्लीट विस्‍तारित करण्‍यासाठी ब्‍लू स्‍मार्ट मोबिलिटीसोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. या करारांतर्गत कंपनीला ३,५०० एक्‍सप्रेस टी ईव्‍हींचा पुरवठा करण्‍याचे कंत्राट मिळाले आहे. हा कंत्राट इलेक्ट्रिक फ्लीट बाजारपेठेतील प्रमुख संपादन आहे, कारण आज अधिकाधिक ग्राहक पर्यावरणास-अनुकूल वाहनांमधून प्रवास करण्‍याला पसंती देत आहेत.

टाटा मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सचे (कमर्शियल) प्रमुख रमेश दोराईराजन म्‍हणाले, ”एक्‍सप्रेस-टी ईव्‍हीसह टाटा मोटर्सने विशेषत: फ्लीट ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक सेदान विकसित केली आहे. आम्‍हाला ब्‍लू स्‍मार्ट मोबिलिटीसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे आणि आम्‍ही दिल्‍ली-एनसीआरमधील वाढत्‍या इलेक्ट्रिक फ्लीटमध्‍ये त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांसाठी त्‍यांचे आभार मानतो. एक्‍सप्रेस-टी ईव्‍ही सानुकूल बॅटरी आकार, लक्षवेधक फास्‍ट चार्जिंग सोल्‍यूशनसह येते, ज्‍यामधून उल्‍लेखनीयरित्‍या कमी मालकीहक्‍काच्‍या खर्चासह सुरक्षितता व प्रवाशांसाठी आरामदायी सुविधेची खात्री मिळेल. म्‍हणूनच हे फ्लीट मालक व ऑपरेटर्ससाठी व्‍यापक व लक्षवेधक तत्त्व आहे. आम्‍ही नुकतेच रस्‍त्‍यावर १०,००० ईव्‍हींचा महत्त्वपूर्ण टप्‍पा पार केला, ज्‍यामधून आमच्‍या नाविन्‍यपूर्ण इलेक्ट्रिक वेईकल्‍सना ग्राहकांकडून मिळत असलेला प्रतिसाद प्रबळपणे दिसून येतो. ही ऑर्डर ईव्‍हींना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाला अधिक दृढ करेल.”

अतिरिक्‍त इलेक्ट्रिक फ्लीटसह आपला व्‍यवसाय विस्‍तारित करत ब्‍लू स्‍मार्ट मोबिलिटीचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनमोल सिंग जग्‍गी म्‍हणाले, ”आमच्‍या अलिकडील २५ दशलक्ष यूएस डॉलर्सच्‍या सिरीज ए फंडिंगसह ब्‍लू स्‍मार्ट मोबिलिटीमध्‍ये आम्‍हाला उत्तम भांडवल मिळाले आहे आणि आम्‍ही दिल्‍ली एनसीआर बाजारपेठेत स्थिरगतीने विस्‍तार करत आहोत. टाटा मोटर्स आमच्‍यासारख्‍या नवीन स्‍टार्टअपसाठी उत्तम सहयोगी राहिली आहे आणि जागतिक पुरवठा साखळी संकटामध्‍ये असण्‍याच्‍या काळात आमच्‍या विकासगतीला लक्षणीयरित्‍या पाठिंबा दिला आहे. टाटा मोटर्ससोबतचा हा सहयोग आमच्‍या इलेक्ट्रिक प्रवासामधील आमचा विश्‍वास अधिक दृढ करतो आणि आम्‍हाला अधिक जलद गतीने मोठे यश संपादित करण्‍यामध्‍ये उत्तमरित्‍या सुसज्‍ज करतो.”

दिल्‍ली एनसीआरमध्‍ये ऑल-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग सेवा देणा-या ब्‍लू स्‍मार्ट मोबिलिटीला विश्‍वसनीयता व दर्जात्‍मक सेवेला महत्त्व देणा-या ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. २५०,००० हून अधिक अ‍ॅप डाऊनलोड्ससह मोबिलिटीमधील चॅलेंजर ब्रॅण्‍डने इलेक्ट्रिक वाहनांवर २२ दशलक्ष किमीहून अधिक अंतर पार करत आतापर्यंत ७००,००० हून अधिक राइड्स पूर्ण केल्‍या आहेत, कंपनीला फक्‍त महिला युजर्ससाठीच नाही, तर महिला ड्रायव्‍हर-सहयोगींसाठी पसंतीचे व्‍यासपीठ असण्‍याचा अभिमान वाटतो. या महिला ड्रायव्‍हर-सहयोगींना कोणत्‍याही मालमत्ता मालकीहक्‍क त्रासांशिवाय तणावमुक्‍तपणे कमावण्‍याची समान संधी मिळत आहे.

नवीन एक्‍सप्रेस-टी इलेक्ट्रिक सेदानमध्‍ये २ रेंज पर्याय – २१३ किमी व १६५ किमी (चाचणीअंतर्गत असलेली एआरएआय प्रमाणित रेंज) देणा-या २१.५ केडब्‍ल्‍यूएच व १६.५ केडब्‍ल्‍यूएचच्‍या उच्‍च ऊर्जा घनतेची बॅटरी आहे. दोन ट्रिम पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या एक्‍सप्रेस-टी ईव्‍हीमधील व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये झीरो टेल-पाइप उत्‍सर्जन, सिंगल स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन, ड्युअल एअरबॅग्‍ज, एबीएससह प्रमाणित म्‍हणून ईबीडी आहे. एक्‍सप्रेस-टी फास्‍ट चार्जिंगचा वापर करत ९० मिनिटे व ११० मिनिटांमध्‍ये (अनुक्रमे १६.५ केडब्‍ल्‍यूएच व २१.५ केडब्‍ल्‍यूएचसाठी) ०-८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करता येऊ शकते किंवा कोणत्‍याही १५ अ‍ॅम्पियर प्‍लग पॉइण्‍टमधून देखील चार्ज करता येऊ शकते. प्रिमिअम ब्‍लॅक थीम इंटीरिअरसह प्रमाणित ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल आणि इंटीरिअर व एक्‍स्‍टीरिअरमधील इलेक्ट्रिक ब्‍ल्‍यू अ‍ॅसेण्‍ट्स ही वैशिष्‍ट्ये इतर टाटा कार्सच्‍या तुलनेत या सेदानला वैविध्‍यपूर्ण आकर्षकता देतील.

७० टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह (वायटीडी आर्थिक वर्ष २२) टाटा मोटर्सने सप्‍टेंबर २०२१ मध्‍ये १००० युनिट्सचा टप्‍पा पार केला आहे आणि प्रबळ ऑर्डर बुकिंगसह कंपनीच्‍या ऑटोमोबाइल उद्योगक्षेत्रात स्थिर भवितव्‍य निर्माण करण्‍याच्‍या दृष्टिकोनाला मान्‍यता मिळाली असून ग्राहकांकडून कौतुक करण्‍यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button