अर्थ-उद्योग

‘सिन्थॉल सोप’तर्फे ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ उपक्रम

प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ‘रॉयल एनफील्ड बाइक जिंकण्याची संधी

मुंबई : ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चा ‘लेगसी ब्रँड’ असलेल्या ‘सिन्थॉल’तर्फे, ‘सिन्थॉल लाईम’ आणि ‘सिन्थॉल कूल’ या दोन साबणांच्या खरेदीतून ग्राहकांना ब्रॅंडशी जोडणारा ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ हा एक रोमांचक उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ब्रॅंडच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि त्यांना पुन्हा उत्साही व छान वाटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा हा उपक्रम एक भाग आहे. ‘सिन्थॉल लाईम’ व ‘सिन्थॉल कूल’ या साबणांची खरेदी केलेल्या व या उपक्रमात विजेते ठरलेल्या ग्राहकांना पुढील 2 महिन्यांत 8 ‘रॉयल एनफिल्ड बाईक्स’ आणि 100 ‘वाईल्डक्राफ्ट’ बॅगा ही बक्षिसे मिळणार आहेत. हा उपक्रम 1 मार्चपासून सुरू झाला आहे आणि 30 एप्रिल 2021 पर्यंत तो चालणार आहे.

या स्पर्धेत कोणीही व्यक्ती पुढीलप्रकारे भाग घेऊ शकते.. जेव्हा एखादा ग्राहक सिन्थॉल साबण खरेदी करील, तेव्हा त्या साबणाच्या पॅकेजमध्ये आतील बाजूस एक कोड नंबर छापलेला त्यास आढळेल. ग्राहकाने हा कोड नंबर 07777062444 या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पाठविणे आवश्यक आहे. यातील विजेत्यांच्या नावांची घोषणा www.cinnolawesomerewards.com या मायक्रोसाईटवर 17 मार्चपासून प्रत्येक बुधवारी होईल. कोविड साथीच्या दरम्यान लोकांचे मनोबल वाढवणे आणि ग्रीष्म ऋतु सुरू होण्याच्या काळात ‘सिन्थॉल कूल’ आणि ‘लाईम’ या उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चे (जीसीपीएल) भारत आणि सार्क या क्षेत्रांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, “सिन्थॉल हा देशातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅण्डपैकी एक आहे आणि ग्राहकांमध्ये या ब्रॅंडविषयी अजूनही ओढ आहे. या ब्रॅंडच्या साबणाने स्नान करून ताजेतवाने होण्याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, ग्राहकांना आनंदित करणे आणि त्याचवेळी सिन्थॉल साबणांची, विशेषत: ‘लाईम’ व ‘कूल’ या ब्रॅंड्सची विक्री वाढवणे हा आमचा हेतू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या साबणांमधून ग्राहकांना ‘लेमनी’ आणि ‘आईसी-कूल’ फ्रेशनेस मिळेल, आणि त्याचबरोबर या उपक्रमामधून त्यांना बक्षीस जिंकण्याचा आनंदही मिळेल.”

ताजेपणाचा अनुभव देणाऱ्या ‘लेमनी डीओ’ सुगंधाने बनविलेला, ‘सिन्थॉल लाईम’ हा उत्साह निर्माण करणारा आहे. त्याच्या वर्धित ‘लाईम फ्रेशनेस’मुळे आपल्या सर्व संवेदना जागृत होऊन स्नानाचा एक विस्मयकारी अनुभव आपल्याला मिळतो. ‘सिन्थॉल कूल’मध्ये बर्फाळ थंड ताजेपणा आणि सक्रिय डीओ सुगंध आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साह वाटत राहतो. यातील अतिरिक्त-थंड मेन्थॉलमुळे आपली त्वचा ताजीतवानी, रसरशीत आणि उन्हाळ्याच्या त्रासापासून मुक्त राहते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button