मॅकडोनाल्ड्स इंडियाची (पश्चिम व दक्षिण) रश्मिका मंदाना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

मुंबई : मॅकडोनाल्ड इंडियाने (पश्चिम व दक्षिण) त्यांच्या प्रमुख जाहिराती मोहिमांसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून लोकप्रिय चित्रपट सेलिब्रिटी – रश्मिका मंदानाची निवड केली आहे. रश्मिका घराघरांमध्ये ओळखीची असून मिलेनियल्समध्ये, विशेषत: देशाच्या दक्षिणी राज्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तिने तेलुगु व कन्नड चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे जसे ‘चलो’, ‘किरिक पार्टी’, ‘सरिलेरू नीकेवरू’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉमरेड’. या चित्रपटांना यूट्यूबवर २०० दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रश्मिका लवकरच अल्लु अर्जुनसोबत मॅगनम ओपसचा चित्रपट ‘पुष्पा’मध्ये दिसणार आहे आणि दोन सलग हिंदी चित्रपटांसह बॉलिवुडमध्ये देखील प्रवेश करणार आहे. अल्पावधीतच ती तरूणांची आयकॉन बनली आहे. तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स असण्यासोबत एकट्या इन्स्टाग्रामवर १५ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हा सहयोग मॅकडोनाल्ड्ससाठी लक्षणीय टप्पा आहे, जेथे त्यांनी प्रमुख बाजारपेठांमधील त्यांचे ब्रॅण्ड नेतृत्व अधिक प्रबळ करण्याचा संकल्प केला आहे. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लि. (डब्ल्यूडीएल) तिच्या पूर्णत: मालकीच्या उपकंनीच्या माध्यमातून पश्चिम व दक्षिण भारतातील मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरण्ट्सचे कार्यसंचालन पाहते.
या सहयोगाच्या घोषणेबाबत बोलताना मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या (पश्चिम व दक्षिण) मार्केटिंग व कम्युनिकेशन्सचे संचालक अरविंद आरपी म्हणाले, आम्हाला रश्मिकाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्याचा आनंद होत आहे. ती मिलेनियल्ससोबत उत्तमरित्या संलग्न असून लोकप्रिय युथ आयकॉन आहे.
‘नॅशनल क्रश’ म्हणून लोकप्रिय असलेल्या रश्मिकाने विविध प्रसंगी तिच्या सोशल मीडिया हँडल्सच्या माध्यमातून फूडप्रती तिचे प्रेम व्यक्त केले आहे. रश्मिका प्रमुख ब्रॅण्ड मोहिमांचा भाग असणार आहे आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये मॅकडोनाल्ड्ससाठी ब्रॅण्ड प्रेम वाढवण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावेल.
ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असण्याबाबत अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली, ”मॅकडोनाल्ड्स हा बालपणापासून माझा आवडता ब्रॅण्ड राहिला आहे. मी कॉलेजमध्ये असताना फूडसाठी मॅकडोनाल्ड्सवरच अवलंबून राहिले. ते माझ्याकडे या सहयोगासाठी आले तेव्हा मला खूपच आनंद झाला. तसेच ग्राहकांना उत्तम दर्जाचे स्वादिष्ट फूड देणा-या ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करण्याचा मला आनंद होत आहे. मॅकडोनाल्ड्स २५ वर्षांपासून भारतीय ग्राहकांना सेवा देत आला आहे आणि त्यामध्ये वाढ होत आहे. हा ब्रॅण्ड निश्चितच सर्व वयोगटातील व्यक्तींचा पसंतीचा बनला आहे. मी अशा अद्भुत व विश्वसनीय ब्रॅण्डसोबतच्या माझ्या सहयोगाबाबत खूपच उत्सुक आहे.”




